नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे सोमवारी निधन झाले. गेली नऊ वर्षे ते कोमात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय राजकारणातील प्रदीर्घ काळ पाहिलेल्या प्रियरंजन दासमुन्शी यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1945मध्ये झाला. दक्षिण कोलकाता मतदार संघातून 1971मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात 1985मध्ये त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी पहिल्यांदा मिळाली.


2004मध्ये लढवली शेवटची निवडणूक


प्रियरंजन दासमुन्शी यांच्या मागे पत्नी दीपा दासमुन्शी, मुलगा प्रियदीप दासमुन्शी असा परिवार आहे. दीपा दासमुन्शी यांच्यासोबत 1994मध्ये त्यांनी विवाह केला. दीपा पश्चिम बांगालमधील या पश्चिम बंगालमधील रायगंज येथून लोकसभेवर प्रतिनिधीत्व करतात. सन 2004मध्ये प्रियरंजन दासमुन्शी यांनी लोकसभेसाठी शेवटची निवडणूक लढवली आणि त्यात ते निवडूनही आले.


हृदयविकाराचा झटका आल्यापासून कोमात


दरम्यान, 2008मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते कोमात गेले. तेव्हापासून ते कोणाल ओळखत नव्हते तसेच, बोलतही नव्हते. त्यांना दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेलिकड सायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही कालावधीनंतर पुढील उपचारासाठी त्यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले.