मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. दिल्लीत त्यांनी अखेरच श्वास घेतला.
Veteran CPM leader Sitaram Yechury passes away : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. याच दरम्यान, अचानक प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
नुकतेच मोतीबिंदू ऑपरेशन
माकपने सोशल मीडियावर यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याच दरम्यान, त्यांची प्रकृती बिघल्याने त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, दोन दिवसांपूर्वी प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
कोरोनात मुलगा गमावला
सीताराम येचुरी यांना एक मुलगा आशीष येचुरी (34) आणि एक मुलगी अखिला येचुरी होते. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आशीष येचुरी यांचे निधन झाले. सीताराम येचुरी यांच्या पत्नीचं नाव सीमा चिश्ती येचुरी असून त्या ज्येष्ठ पत्रकार आहेत.
सीताराम येचुरी यांची राजकीय कारकिर्द
गेली 40 वर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारसरणीसाठी आयुष्य झोकून देणारे येचुरी राज्यसभा खासदारही होते. 2005 ते 2017 पर्यंत ते राज्यसभा खासदार होते. त्यांनी 2005 ते 2015 पर्यंत माकपचे जनरल सेक्रेटी पद भूषविले. 1996 मध्ये काँग्रेससोबत युनायटेड फ्रंट या राष्ट्रीय आघाडीकरिता कॉमन मिनिमम प्रोग्राम आखण्यात आणि 2004 मध्ये यूपीए स्थापित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.