नवी दिल्ली : उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया शुद्धीवर आले. यानंतर त्यांनी मंगळवारी अहमदाबादच्या हॉस्पीटलमध्येच एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी आपल्या एन्काऊंटरचा कट


कुठे गायब झाले होते तोगडिया?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान सरकारनं माझ्या एन्काऊंटरसाठी पोलिसांना पाठवलं होतं, अशी माहिती मला एका कार्यकर्त्याकडून समजली. मला सांगितलं गेलं की राजस्थान पोलिसांची टीम गुजरात पोलिसांसोबत मला पकडण्यासाठी येत आहे. त्यामुळे मी तिथून निघालो... माझ्याकडे तेव्हा काहीही नव्हतं... मी माझ्या 'झेडप्लस' सिक्युरिटीला सांगून निघालो होते... ऑटो रिक्षा घेऊन एअरपोर्टकडे रवाना झालो... जयपूर जाऊन हायकोर्टाकडून वॉरंटविरुद्ध स्टे ऑर्डर घेऊ, असं मला वाटलं... लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून फोन बंद केले होते... यावेळी कुणीही ओळखू नये म्हणून मी शाल घेतली होती... त्यानंतर मी अचानक बेशुद्ध झालो... डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पीटलमध्ये होते... अशी कहाणी कथन करताना तोगडियांना अश्रू अनावर झाले होते.


'आवाज दाबण्याचा प्रयत्न'


मी आजवर हिंदू संघटनांच्या एकतेचं काम केलं आणि करत राहीन... माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असंही त्यांनी यावेळी म्हटलं. हा प्रयत्न कोण करतंय? असा प्रतिप्रश्न त्यांना विचारला गेला तेव्हा 'मी पुराव्यांसहीत स्पष्ट करेन' असं त्यांनी म्हटलं.


गोवण्याचा प्रयत्न...


जुने खटले काढून मला गोवण्याचा प्रयत्न.. कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला... माझ्या घराच्या झाडाझडतीचं वॉरंट का? मी अट्टल गुन्हेगार आहे का? मी कोणतंही कायद्याविरुद्ध काम केलेलं नाही... आम्ही हिंदुत्व मागे टाकावं म्हणून याच नाही तर इतरही राज्यांत जुने खटले काढून आपल्याला गोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत... माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, असंही तोगडियांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.   


व्हिडिओ पाहा...