नवी दिल्ली:  राम रहिम बाबाच्या मुसक्या आवळल्यानंतर इतर सर्व स्वयंघोषित बाबाबुवांचे धाबे दणाणले आहेत. राधे मॉच्या अडचणीतही गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) सुरेंद्र मित्तल यांनी राधे मॉविरूद्ध गंभीर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधे मॉं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भुरळ घालायची, तसे न केल्यास अपमानास्पद बोलायची असे सुरेंद्र मित्तल यांनी सांगितले.  ते आता राधे मॉंच्या विरोधात खटला भरण्याची तयारी करीत आहेत. या सगळ्याचा विरोध केला तेव्हा ती भडकून अपमानास्पद बोलू लागली ज्यानंतर ते राधे माकडे जाणे थांबविल्याचे सुरेंद्रने सांगितले.


हा संपूर्ण खटला दोन वर्षांपूर्वीचा असून मांध्यमांनीही उचलून धरल्याचे सुरेंद्र मित्तल यांनी सांगितले. त्यांच्या वकिलाने याप्रकरणी राधे मॉंला नोटीस पाठविली. आता ते राधे मॉंच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करीत आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालयाने कठोर कारवाई करावी,खोटी ओळख घेवून फिरणाऱ्या ढोंगी बाबाबुवांचे चेहरे समोर यायला हवेत असेही ते म्हणाले. 


१३ ऑक्टोबरला सुनावणी


राधे मॉंच्या विरोधात कारवाई न करणाऱ्यांविरोधात कारवाई का होत नाही असा सवाल पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने कपूरथला जिल्ह्याच्या एसएसपीला नोटीसद्वारे विचारला होता.
प्रसंगोपात, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एसएसपी कपूरथला जिल्हा आधी काही दिवस स्वत: ची जाहीर देवी राधे आईच्या बाबतीत कारवाई नाही बाबतीत त्या विरोधात कारवाई अवरोधित की सूचना जारी करण्यास सांगितले होते, का चालत नाही.


न्यायमूर्ती दया चौधरी यांच्या खंडपीठाने सुरेन्द्र मित्तल यांच्या तक्रारीवर कारवाई केली आणि ही सूचना एसएसपीकडे पाठवली. जस्टिस दया चौधरी यांच्या बॅंचने सुरेंद्र मित्तलच्या तक्रारीवर कार्यवाही करत एसएसपीला नोटीस पाठवली. याप्रकरणी आता १३ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.