रामराजे शिंदे, रायबरेली : रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत. सोनिया गांधी यांचा रायबरेलीतून पुन्हा लोकसभेत जाण्याचा मार्ग सोपा नाही. रायबरेली मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. सोनिया गांधी मागील १५ वर्षापासून लोकसभेत रायबरेलीचं नेतृत्व करतात. यावेळेस पुन्हा निवडणूकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या समोर भाजप उमेदवार दिनेस प्रताप सिंग आहेत. दिनेश प्रताप सिंग यापूर्वी काँग्रेसमध्येच होते. काही महिन्यापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिकीट मिळालं. 


रायबरेली जातीय समीकरणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ टक्के एससी 
४२ टक्के ओबीसी 


यावेळेस सपा आणि बसपा दोघांनीही सोनिया गांधी यांना पाठिंबा दिला आहे. तर मागील निवडणूकीत पावणे दोन लाख मत मिळवणारे व्यापारी समुदायाचे अजय अगर्वाल यांना भाजपने तिकीट दिले नाही. त्यामुळे नाराजी वाढली आहे. 


रायबरेलीचं नाव मोठं असलं तरी इथे विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे लोकांची नाराजी तर आहेच शिवाय मोदींचा करिष्मा अद्यापही तरूणाईमध्ये आहे. रायबरेलीत उद्योगाची अवस्था वाईट आहे. सोनिया गांधी यांच्या कालवाधीतच दीडशे पैकी जवळपास १३० कारखाने बंद पडले. त्यामुळे बेरोजगारी वाढली. यावर कामगार काँग्रेसला जाब विचारत आहे. 


आत्ताचे भाजप उमेदवार यापूर्वी काँग्रेसमध्येच होता त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांसोबत अद्यापही नाळ जुळली नाही. भाजप उमेदवार आणि कार्यकर्त्यांमधील असमन्वय हा भाजपसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांचा मार्ग सुकर झाला आहे. 


भाजप विकासाचा मुद्दा पुढे करत असली तरी रायबरेलीचे मतदार भावनिक आहेत. आता जनता विकासाचा मुद्दा निवडते की, सोनिया गांधी यांच्याशी असलेली भावनिक गुंतवणूक हे निकालातून स्पष्ट होईल.