Trending Video : आजची दुनिया ही सोशल मीडियाची (Social media) आहे. तरुण पिढी सतत आपल्या आजूबाजूला रील्स (Reels) आणि व्हिडिओ (Video) काढताना दिसतात. ऑफिस असो किंवा कॉलेज अगदी रस्त्यावर कुठेही हे सोशल मीडिया वेडे लोक आपल्याला विचित्र व्हिडिओ काढताना दिसतात. यातील अनेक जण आज सोशल मीडियामुळे प्रसिद्ध झाले आहेत. काही लोक तर यातून पैसेही कमवतात. एखाद्या गोष्टीचा ट्रेंडला (trend) आला तर काही दिवस सोशल मीडियावर त्याचीच हवा असते. सध्या पतली कमारिया मोर हाय हाय या गाण्याची क्रेझ दिसून येतं आहे. 


दिल तो बाग बाग हो गया!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर कॉलेजमधील सुंदर आणि आकर्षक मुलींची चर्चा सुरु आहे. कारण या चार मुलींनी कॉलेजमध्ये रील बनवलं आणि झालं ना ते व्हायरल...या मुलींच्या रीलने यूजर्सला वेड लावलं आहे. हा व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम (Instagram) आणि ट्विटरवर (Twitter) धुमाकूळ घालतो आहे. 


मुलींचा स्वॅगच वेगळा!


या मुलींनी भोजपुरी गाणं पतली कमारिया मोर हाय हाय यावर रील्समध्ये जी अदा दाखवली आहे. ते पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. 10 सेकंदचा हा व्हिडिओ तुफान ट्रेंडमध्ये आहे. काय ती अदा, काय ते स्टेप, काय ती स्माईल...या तरुणींनी नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. 



पतली कमारिया मोर हाय हाय या गाण्यावर या चौघींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. कॅची हुक स्टेप्स करताना या सुंदर मुलींना पाहून दिल तो बाग बाग हो गया असं काहीसं नेटकऱ्यांचं होतं आहे. हा व्हिडिओ @Gulzar_sahab या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 91 हजार व्ह्यूज मिळाले आहे.