नवी दिल्ली : गुजरात निवडणूक प्रचार रणधुमाळीत व्यस्त असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना बुधवारी नवसारी रॅली दरम्यान एक वेगळाच प्रसंग अनुभवायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचं झालं असं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंचावर स्वागत होत होतं... तेवढ्याच एक लहान मुलगा मंचावर दाखल झाला... त्याला पाहून पंतप्रधानही थोड्या वेळ आश्चर्यचकीत झाले.


हा मुलगा 'बाल नरेंद्र मोदी' बनून मंचावर दाखल झाला होता. पंतप्रधान मोदी करतात तसा पोषाख त्यानं आपल्या अंगावर चढवला होता... चेहऱ्यावर पीएम मोदींचा मास्क होता... पंतप्रधान मोदींप्रमाणेच या चिमुरड्यानंही आपल्या हातावर काळा धागा बांधला होता.


हा प्रसंग पाहणारे आपलं हसू आवरू शकले नाहीत... इतकंच नाही तर खुद्द मोदींनाही आपलं हसू आवरणं अशक्य झालं.


'वाह क्या बात है' असा आपल्या हातानंच इशारा करत पंतप्रधान मोदींनी या चिमुरड्याशी हात मिळवला.... आपल्या आपल्यापाशी बोलावून खुर्चीवर विराजमान झाले.


मोदींनी या मुलाचा चेहरा गर्दीकडे वळवला... आणि हात हलवण्याचा इशारा केला... गर्दीनंही या चिमुरड्याच्या स्टेजवरच्या या उपस्थितीला आवाजातून दाद दिली...