Video Bear Attack : सोशल मीडियावर (Social media) आपल्याला प्राण्याचे अनेक व्हिडीओ (Animal videos) पाहिला मिळतात. त्यात सर्वात जास्त साप, अजगर यांचे व्हिडीओ (Snake, python video) पाहिले जातात. साप, अजगर, वाघ यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होतं असतात. असाच एक अस्वलाचा माणसांवरील भयानक हल्लेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा अंगावर काटा येतो आहे. 


मृत्यूशी झुंज, व्हिडीओ व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घनदाट जंगलातून एक व्यक्ती दुचाकीवरुन मसाल्याचे पाकीट घेऊन निघाला होता. अचानक रस्त्यात घनदाज झाड्यांमध्ये लपलेल्या अस्वलाना त्यावर हल्ला (Bear Attack) केला. त्या व्यक्तीला अस्वलाने जोरजोरात चावण्यास सुरुवात केली. रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर लोकांनी ही घटना पाहिली आणि त्या व्यक्तीच्या मदतीला धावले. त्या व्यक्तीची मृत्यूशी झुंज सुरु असतानाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Bear Attack Video) झाला आहे. (Video bear attack Viral on social media nmp) 



परिसरात भीतीदायक वातावरण


लोकांनी आवाज करून आणि दगडफेक करून अस्वलाला पळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अस्वलावर काहीही परिणाम झाला नाही. मोठ्या संख्येने लोक जमले आणि आरडाओरडा करू लागल्याने अस्वल घाबरले आणि जंगलाच्या दिशेने धावले. या हल्ल्यात वैगुंदमणीचे दोन साथीदार नागेंद्रन आणि शैलेंद्र हेही जखमी झाले आहेत. ही घटना तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात असलेल्या जंगलात घडली आहे. अस्वलाच्या हल्ल्यात वैगुंदमणी गंभीर जखमी झाले. दरम्यान अस्वलाला जवळच्या परिसरात शोधून पकडण्यात आले. अस्वलाच्या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.