तामिळनाडू : गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे तेथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरसदृश परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, तामिळनाडूची (Tamil Nadu) राजधानी चेन्नई येथील एका महिला पोलिसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जखमी माणसाला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या महिला पोलिसांचं नाव राजेश्वरी आहे.  त्यांचं हे काम पाहून संपूर्ण देश त्यांना  ''कडक सॅल्यूट'' करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला पोलीस राजेश्वरी यांचा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी 'इन्स्पेक्टर राजेश्वरी यांच्यासारखे मजबूत खांदे कोणाचेच नाहीत. भयंकर पावसात बेशुद्ध पडलेल्या माणसाला रिक्षात बसवून जवळच्या रुग्णालयात नेणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे.' असं लिहिलं आहे. 



टीपी छत्तीराम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्मशानभूमीत काम करणारा 28 वर्षीय मजूर आवारात बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक राजेश्वरी घटनास्थळी पोहोचल्या, पोलिसांनी सांगितले. राजेश्वरी यांच्या कामाचं कौतुक सर्वचं स्तरातून होत आहे.