Viral Video: लाल साडीतल्या तरुणीच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड; सौंदर्यावर अनेकजण झाले फिदा
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक रातोरात स्टार झाल्याची आणि अल्पावधीत लोकांना प्रचंड लोकप्रियता मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच एक व्हडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाल साडीतील मुलगी प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
Video Girl Dancing in Red Sari: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या कारणांसाठी भन्नाट व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. या सोशल मीडियामुळेच लोकांना आपली कला दाखवण्यासाठी नवीन माध्यम उपलब्ध झालं आहे. मागील तीन ते चार वर्षांमध्ये सोशल मीडियावर अशाप्रकारे व्हिडीओ व्हायरल होण्याची आणि त्यामधून अल्पावधीत लोकांना लोकप्रियता मिळवून देण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. यापैकी अनेक व्हिडीओ हे डान्सचे आहेत हे विशेष. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लाल रंगाची (Red Sari Girl Dancing Viral Video)साडी नेसलेली मुलगी डान्स करताना दिसत आहे. या मुलीचा डान्स पाहून अनेकजण तिचं तोंड भरुन कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला एवढे व्ह्यूज मिळाले आहेत की ही मुलगी आता इंटरनेट सेन्सेशन झाली आहे.
या व्हिडीओमध्ये नाचणाऱ्या मुलीने पिवळ्या रंगाचं ब्रेसलेट घातलं आहे. लाल रंगाची साडी परिधान करुन ही तरुणी काही बोल्ड डान्स स्टेप करताना दिसते. 'दुपट्टा मेरा' या गाण्यावर ही तरुणी थिरकताना दिसत असून हा व्हिडीओ पाहून मूळ गाण्यात नाचलेल्या करीना कपूरची नक्कीच आठवण होईल. या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभावही एखाद्या अभिनेत्रीहून कमी नाहीत. या तरुणीच्या डान्सबरोबरच तिच्या सौंदर्यानेही अनेकजण घायाळ झाले आहेत. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
हा व्हिडीओ 'द स्क्रीन' नावाच्या युट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 4 लाख 38 हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत.