मुंबई : 'मासिक पाळी' च्या प्रक्रियेतून प्रत्येक मुलगी जात असते. प्रत्येक ठिकाणचा 'मासिक पाळी' या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. देशातील अनेक भागात 'मासिक पाळी' आलेले स्त्री ला घराच्या कोपऱ्यातील जागा दिली जाते. तसेच देवाधर्माच्या, धार्मिक विधींसारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या विधींपासून तिला दूर ठेवले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातल्या कानाकोपऱ्यात विविध रुढी आणि परंपरा 'मासिक पाळी'शी जोडल्या आहेत.


भारतातील काही भागांमध्ये 'मासिक पाळी' विषयाकडे सकारात्मक विचारातून पाहिले जाते. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी मुलींची पूजा केली जाते. यासंबधीची सविस्तर माहिती घेऊया.


कर्नाटक



कर्नाटकमध्ये मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी शेजराच्या मुली, महिला त्या मुलीची आरती करतात. त्यानंतर तिला गुळापासून बनलेले पदार्थ खायला देत तोंड गोड केले जाते. पूजेदरम्यान मिळालेले नारळ आलेल्या पाहुण्यांना दिले जातात.


तामिळनाडु



मासिक पाळीच्या पहिल्या दिवशीची इथली परंपरा कर्नाटकपेक्षा पुर्णपणे वेगळी आहे. इथे मोठ्या स्तरावर थाटामाटात ही वेळ साजरी केली जाते. या ठिकाणी या परंपरेला मंडल निरट्टू विज्हा (Manjal Neerattu Vizha)असे म्हटले जाते. यावेळी मुलगी सिल्क साडीमध्ये दिसते. 


 


 


आसाम


 


आसाममध्ये मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी केल्या जात असलेल्या परंपरेला 'तुलोनी बिया'(Tuloni Biya)असे म्हटले जाते. यावेळी मुलगी परिवारापासून वेगळ्या खोलीत राहते.  इथे पुरूषांना जाण्यास मनाई असते. चार दिवस पुरूष त्या खोलीत जाऊही शकत नाहीत किंवा तिचा चेहराही पाहू शकत नाहीत.  सात महिला या मुलीला आंघोळ घलतात. तत्पुर्वी लाल कपड्यात सुपारी बाधून ठेवली जाते. मुलीला नवरीप्रमाणे दागिने आणि कपडे परिधान करुन सजविले जाते.


केरळ


पहिल्या मासिक पाळीच्या सुरुवातीच्या तीन दिवस मुलीला सर्वांपासून दूर रहावे लागते. तिला अशा घरात रहावे लागते ज्या ठिकाणी केवळ एखादा दिवा असतो. या दिव्याशेजारी पितळेच्या भांड्यात नारळाची फूले ठेवली जातात. त्या फूलातून जितक्या कळ्या खुलतील तितकी मूल या मुलीला होतील असे मानले जाते.