मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकत (पीएनबी) हजारो कोटी रूपयांचा घोटाळा करून भारताबाहेर पसार झालेल्या निरव मोदीबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अर्थात हा व्हिडिओ म्हणजे अभिनेता अक्षय कुमारचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पॅडमॅन' चित्रपटातील एका गाण्याची पॅरोडी आहे.


आज से मेरे सारे कर्जे तेरे हो गए,.....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत नीरव मोदीला भारतीयांनी एक मजेशीर उत्तर देताना दाखवले आहे. गाण्याचे बोल आहेत, ‘आज से मेरे सरे कर्जे तेरे हो गए, आज से मेरा लोन तेरा हो गया। आज से मेरे सारे खर्चे तेरे हो गए, आज से यूएस घर मेरा हो गया। 11 हजार करोड़ का जो बिल है, आज से तेरा हो गया।’ यागाण्यासाठी पॅडमॅन चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘आज से तेरी…’चे निवड करण्यात आली आहे. या गाण्याच्या माध्यमातून नीरव मोदीची खोचक शब्दांत खिल्ली उडविण्यात आली आहे.



नीरव मोदीने लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू)च्यामध्यमातून पीएनबीला हजारो कोटी रूपयांचा चूना लावला आहे. त्याने केलेल्या घोटाळ्याची सध्या चौकशी सुरू आहे.