India's Unique Temples: भारत आपल्या विविधतेमुळे जगभर प्रसिद्ध आहे. वेगवेगळी जाती, पंत, धर्मांसोबत देशभरातीळ अगदी छोट्या छोट्या कोपऱ्यात मंदिर आहेत.  उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र मंदिरे आहेत.  भारतीयांची यावर खूप विश्वास आहे. आपल्या आपल्यानुसार भारतीय त्यांच्या आवडत्या देवी-देवतांची पूजा करतात. हिंदूंच्या पौराणिक ग्रंथानुसार 33 कोटी देवी-देवतांची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे महाभारतातील खलनायकांची पूजा केली जाते. होय, तुम्ही नीट वाचलं. भारतात अशी काही मंदिरे आहेत जिथे खलनायकांची पूजा केली जाते. चला हिंदू पुराणातील काही प्रसिद्ध खलनायकांच्या मंदिरांबद्दल  जाणून घ्या. 


शकुनी मामाचे मंदिर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाभारत म्हंटल की शकुनी मामा आठवतोच. पण तुम्ही त्याच मंदिर असल्याचे ऐकलं आहे का? होय शकुनी मामाचे मंदिर केरळमधील कोल्लम येथे आहे. पौराणिक कथांनुसार शकुनी, दुष्ट आणि दिशाभूल करणारा, पांडव आणि कौरवांमधील कुरुक्षेत्र युद्ध भडकवण्यास जबाबदार होता. त्याला सामान्यतः खलनायक मानले जाते, परंतु केरळमधील एक समुदाय त्याला चांगला मानतो. या समाजाने पवित्रेश्वरम येथे त्यांच्या सन्मानार्थ मंदिर बांधले. या मंदिराची देखभाल कुरवा समाज करतो.


शकुनी मंदिरात कसे जायचे? 


ट्रेन- हे मंदिर कोल्लम जिल्ह्यात येते. त्यामुळे तुम्ही कोल्लमसाठी थेट ट्रेनने येऊ शकता.  तुम्ही तिथे केरळ एक्सप्रेस किंवा तिरुवनंतपुरम राजधानी ट्रेनने जाऊ शकता.


विमान- जर तुम्हाला फ्लाइटने जायचे असेल तर त्रिवेंद्रमची फ्लाइट घ्या. त्यानंतर तुम्ही बस किंवा लोकल ट्रेनने या मंदिरात जाऊ शकता.


गांधारी मंदिर


कौरवांची आई गांधारी पांडवांच्या विरोधात असल्याने तिला नकारात्मक पात्र म्हणून पाहिले जाते. परंतु लग्नानंतर आयुष्यभर आंधळे राहण्याच्या तिच्या निर्णयाकडे निष्ठावंत म्हणून पाहिले जाते. गांधारी मंदिर 2008 मध्ये म्हैसूरमध्ये सुमारे 2.5 कोटी रुपये खर्चून बांधले गेले.


गांधारी मंदिरात कसे जायचे? 


गांधारी मंदिरात पोहचण्यासाठी 


गांधारी मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला म्हैसूरला जावे लागेल. म्हैसूरसाठी तुम्हाला थेट ट्रेन किंवा फ्लाइट मिळेल. यानंतर टॅक्सी घेऊन नांजागुड येथे जाऊ शकता, जिथे हे मंदिर आहे.


दुर्योधन मंदिर


केरळमधील पोरुवाझी, कोल्लम येथील पेरूवाठी मलानाडा मंदिर हे दुर्योधनाला समर्पित आहे. हे शकुनी मंदिराजवळच आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे  कोणतीही मूर्ती नाही तर फक्त एक व्यासपीठ आहे. देवाला ताडी, सुपारी, कोंबडा आणि लाल वस्त्र देवतेला अर्पण केले जाते.


कर्ण मंदिर


उत्तरकाशी येथे पांडवांचा शत्रू कर्णाचे मंदिर आहे. जरी त्याला दानवीर म्हणूनही ओळखले जाते, परंतु कौरवांच्या बाजूने लढताना त्याने वाईटाचे समर्थन केले, म्हणून त्याला खलनायक देखील मानले जाते. येथे इच्छा पूर्ण झाल्यावर मंदिराच्या भिंतीवर नाणी फेकली जातात.


कसे पोहोचायचे?


कर्ण मंदिरला जाण्यासाठी डेहराडूनला रेल्वेने किंवा विमानाने जा. पुढे तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने उत्तरकाशीला पोहोचू शकता.