मुंबई: ऑटोमॅटिक चालणाऱ्या टेस्ला कारनंतर आता ऑटोमॅटिक चालणाऱ्या एका बाईकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हे कसं शक्य आहे असंही काही युझर्स म्हणाले. या व्हिडीओवर आनंद महिंद्रा यांनी देखील कमेंट केली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा दररोज त्याच्या ट्विटर अकाऊंटवर काही व्हिडीओ किंवा पोस्ट करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनीच हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की व्यक्ती बाईकवर अडवा बसला आहे. दोन्ही हात हॅण्डलला न पकडता त्याने हाताची घडी घातली आहे. गाडी आपल्या आपणच चालताना दिसत आहे. @DoctorAjayita नावाच्या एका युझरने पहिल्यांदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ रिट्वीट करत कमेंट लिहिली आहे. 


बाईकच्या ड्राईव्हिंग सीटवर कोणीच बसलेलं दिसत नाही. @DoctorAjayita नावाच्या युझरने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, मी भारतात ड्रायव्हरशिवाय चालणारी गाडी आणू इच्छितो. तर दुसरीकडे भारतात काय सुरू आहे असं सांगणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


आनंद महिंद्र यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, मुसाफिर हूं यारों... ना चालक ना ठिकाणा असं म्हणत आनंद महिंद्रा यांनी पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.