प्रश्न फारच सोपा... या फोटोत तुम्हाला किती आकडे दिसतायेत? अनेकांना देता आलं नाही उत्तर
Viral Brain Teaser: सोशल मीडियावर अनेकदा बुद्धीला चालना देणारे ब्रेन टिझर्स व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अनेकजण यामुळे गोंधळून गेले आहेत. तुम्हाला हे कोडं सोडवता येतंय का पाहा बरं
Viral Brain Teaser: सोशल मीडियावर (Social Media) दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबरोबरच अनेक रॅण्डम गोष्टी व्हायरल होत असतात. यापैकी काही गोष्टी खरोखरच अनेकांचं लक्ष वेधून घेतात. काही गोष्टी युजर्सला स्क्रोलिंग थांबवून विचार करायलाही लावतात. खास करुन ब्रेन टिझर्स (Brain Teaser) म्हणजेच सोशल मीडियावरील व्हायरल कोडी अनेकांना खिळवून ठेवतात, विचार करायला भाग पाडतात. असेच एक कोडे मागील महिन्याभरापासून चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रश्न फारच सोपा आहे
खरं तर सोशल मीडियावरील ब्रेन टिझर्सचं उत्तर सापडल्यानंतर होणारा आनंद आणि कमेंट सेक्शनमध्ये उत्तरावर सुरु असलेली चर्चा वाचण्यातही वेगळीच गंमत असते. त्यामुळेच हा ब्रेन टिझर्स सारखा प्रकार मागील काही काळामध्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचा ट्रेण्ड दिसून येतं. सध्या नेटकऱ्यांना गोंधळून टाकणारं ब्रेन टिझरही फारच रंजक आहे. तसं म्हणायला गेलं तर प्रश्न फार सोपा आहे. या कोड्यामध्ये फोटोत युजर्सला नेमके किती आकडे दिसत आहेत हे सांगायचं आहे. मात्र हे इंग्रजीमध्ये लिहिलेले हे आकडे एकमेकांमध्ये अडकलेले किंवा गुंतागुंतीचे असल्याचं दिसत आहे.
4 हून अधिक आकडे दिसत असतील तर...
"तुम्हाला या फोटोमध्ये 4 हून आकडे दिसत असले तर डबल टॅप करा," असा मजकूर इन्स्ताग्रामवरील अनसीन इल्यूजन नावाच्या हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. तुम्हाला यामध्ये किती आकडे दिसत आहेत? अशा कॅप्शनसहीत हा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आळा असून तो आता व्हायरल होत आहे. खरं कर वर वर पाहिलं तरी या आकड्यांच्या सेटमध्ये 4 हून अधिक आकडे असल्याचं दिसत आहे. म्हणजेच 6, 8, 4, 1 यासारखे आकडे सहज दिसून येत आहेत. मात्र वरवर दिसणाऱ्या या आकड्यांबरोबरच एकूण किती आकडे या फोटोमध्ये आहेत याबद्दलची चर्चा कमेंट सेक्शनमध्ये दिसून येत आहे.
तुम्हाला किती आकडे दिसतायत पाहा बरं
खरं ते हे कोडं अनेकदा वेगवेगळ्या अकाऊंटवरुन सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे. मागील महिन्याभरापासून पुन्हा हे कोडं चर्चेत आलं आहे. काहींनी या सेटमध्ये एकूण 7 आकडे असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी 9 आकडे या आकृतीत लपल्याचं म्हटलं आहे. तुम्ही सुद्धा एकदा या फोटोवर नजर टाकून किती आकडे दिसतायत तुम्हाला सांगा पाहू...
एकजण म्हणतोय 'हा' एक आकडा सोडून सगळे आहेत
एका युझरने 1 ते 9 आणि शून्य या आकड्यांचा विचार केला तर केवळ 5 हा आकडा या आकृतीत नाही असं म्हटलं आहे. अन्य एकाने 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 0 हे नऊ आकडे या आकृतीत असल्याची कमेंट केली आहे. तुम्हाला या आकृतीत किती आकडे दिसत आहेत कमेंट करुन नक्की सांगा.