पटना : बदलत्या काळानुसार योग्य पावले टाकत पोलिसांनी बलात्कारातील आरोपींची ओळख पटवली आहे. काही दिवसांपासून सामुहिक बलात्काराची क्लीप सोशल मीडियातून व्हायरल झाली होती. ही क्लिप पाहून पोलिसांनी पीडितेची ओळख पटवली. तसेच, आरोपींनाही अटक केली. व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये चार युवक एका महिलेवर रेप करताना दिसत होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


आरोपी आणि पीडिता एकाच परिसरातील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटना बिहारमधील पटना येथील आहे. वरीष्ठ पोलिस अधिकारी नैय्यर हसनैन खान यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओत दिसत असलेली पीडिता साधारण १९ ते १९ वर्षांची आहे. पीडिता ही जहानाबाद जिल्ह्यातील राहणारी असून, ती विवाहीत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, चारपैकी एक युवक पीडितेवर बलात्कार करत आहे. तर, दुसरे तीघे आता माझी पाळी असे म्हणत तिला बोलवत आहेत.


आरोपी चेन्नईला पळाल्याचा संशय


खान यांनी पुढे सांगितले की, 'व्हिडिओत दाखवत असलेली वेळ साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वीची आहे. ही घटना नौबतपूर येथील नारायणपुर मुसहारी येथील आहे. महत्त्वाचे असे की, आरोपीसुद्धा याच परिसरात राहणारे आहेत. आम्हाला संशय आहे की, या घटनेनंतर आरोपी चेन्नईला पळाले आहेत. या महिलेचा विवाह या चारपैकी एका युवकाशी झाला आहे काय? याचाही तपास आम्ही करत आहोत, असे खान यांनी सांगितले.