नवी दिल्ली: आतापर्यंत तुम्ही गायीच्या शेणापासून तयार केलेल्या शेण्या किंवा त्यापासून राखूंडी केल्याचं ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. गोमूत्र पितात हे माहीत आहे. मात्र शेणं खाण्यावर चक्क एका डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डॉक्टर गायीचं शेण कसं खावं याबाबत माहिती देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमबीबीएस डॉक्टर मनोज मित्तल यांनी गेल्या काही वर्षांपासून गोमूत्र घेतात आणि त्याशिवाय गायीचं शेण खात असल्याचा दावा केला. शेणामध्ये व्हिटॅमिन B 12 असतं असा दावाही त्यांनी केला आहे. जो आपल्याला रेडिएशनपासून वाचवतो. 


डॉक्टरने केलेल्य़ा दाव्यानुसार मोबाईल, फ्रीज, एसीमधून येणाऱ्या रेडिएशनमधून आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात. गायीचं शेण खाल्ल्यानं या रेडिएशनचा शरीरावर होणारा परिणाम कमी करण्याचं काम केलं जातं.



शेणामुळे थंडावा निर्माण होतो, म्हणून भिंती किंवा गाडीवर शेणाचा लेप लावल्याचे प्रकार पाहिले असतील. मात्र गायीचं शेण खाल्ल्याने शरीराला फायदा होतो हे सांगणाऱ्या डॉक्टरचा सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 


या व्हिडीओवरून सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. तर या डॉक्टर मित्तल यांची डिग्री खरी की खोटी असाही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेचा विषय बनला आहे. 





हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.