Viral News : लग्नाच्या 12 वर्षांनंतर नवऱ्याला कळलं पत्नीचं धक्कादायक सत्य, `त्या` गोष्टीसाठी माझी फसवणूक केली...
Trending News : लग्नाच्या पवित्र आणि विश्वासाच्या नात्याला तब्बल 12 वर्षांनंतर तडा गेला. जेव्हा नवऱ्याला पत्नीचं धक्कादायक सत्य कळलं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Trending News : पश्चिम बंगालमधील आसनसोलमधील व्यापारी ताबीश एहसानने नाझिया अंबरीन कुरेशीशी निकाह केला. या दोघांच्या लग्नाला तब्बल 12 वर्षे झाली. या वर्षांमध्ये नवऱ्या बायोकमधील संसार अगदी सुखात होता. पण अचानक एकेदिवशी पत्नीचं धक्कादायक सत्य नवऱ्याच्या समोर आलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली फसवणूक झाली असं म्हणते ताबीशने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर या पतीने भारतातील राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक विभाग आणि एजन्सींमध्ये मदतीची याचना केली आहे. (Viral news 12 years after marriage man finds out his wife is a bangladeshi national trending news)
नेमकं काय झालं?
एका खाजगी वाहिनीशी बोलताना 37 वर्षीय तबीशने त्याची आपबीती सांगितली. एका लग्नात या दोघांची भेट झाली. तबीशला नाझिया पहिल्या नजरेत आवडली. घरी जाऊन तबीशने कुटुंबियांना नाझियाबद्दल सांगितलं. घरच्यांनी लग्नाला होकार देत त्या दोघांचं लग्न 2009 मध्ये लावून दिलं. लग्नाच्या वेळी नाझियाने सांगितलं होतं की ती भारतातील यूपीची रहिवासी आहे.
संसार सुरु झाला सगळं आनंदी आनंद होतं. आम्हाला पहिलं मुलं झालं, त्यानंतर 2022 मध्ये दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी नाझिया विचित्र वागू लागली. ती प्रसूतीसाठी माहेरी गेली. तिथे गेल्यावर तिने माझ्याशी बोलणं बंद केलं. पण मी सासरच्या लोकांशी संपर्क साधला. त्यावेळी कळलं की, नाझिया आमच्याकडे आलीच नाही असं सांगितलं. हे ऐकून मला धक्काच बसला.
त्यानंतर नाझियाचं धक्कादायक सत्य समोर आलं. नाझिया ही भारतीय नसून बांगलादेश असल्याचं समोर आलं. एवढंच नाही तर नाझियाचं लग्न बांगलादेशातील एका शिक्षिकेशी झालं होतं. नंतर त्याने तिला घस्फोट दिला. नाझियाचे वडील राजकारण्यांशी संबंध आहे. त्यामुळे याचा फायदा घेत नाझियाच्या पहिल्या पतीला खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं. त्यानंतर नाझिया आपल्या कुटुंबासह अवैधरित्या भारतात आली. व्हिसा नसतानाही ते भारतात राहू लागले.
तबीश या प्रकरणात असा आरोप केला आहे की, त्यांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनी मला प्यादा बनवला. नाझियाचं लग्न माझ्याशी झालं पाहिजे, म्हणून त्यांनी संपूर्ण प्लन केला होता. दरम्यान तबीशने कोलकातामधील तिलजाला पोलीस ठाण्यात नाझिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तबीशने असं सांगितलं की, 2007 ते 2009 या काळात नाझिया तिच्या शिक्षणादरम्यान कॅनडाला गेली होती. पण 2020 मध्ये जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा तिला पहिल्यांदाच भारतीय पासपोर्ट मंजूर झाला. पासपोर्टशिवाय मग ती कॅनडाला कशी गेली? कॅनडाने तिला व्हिसाशिवाय मान्यता कशी दिली, असा प्रश्न तबीशने उपस्थित केला आहे.
ताबीशच्या वकिलांने आरटीआय दाखल केला होता. त्यामध्ये नाझियाने भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि शैत्रणिक प्रमाणपत्रे दिल्याचं उघड झालं आहे. या पुरावाच्या आधारे आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाझियाचा पासपोर्ट रद्द केला आहे. तिने ताबिशचाच नव्हे तर भारत सरकारचा विश्वासघात केला आरोप ताबीशने केला आहे.