गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराने मारली स्वत:ला गोळी
या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केली, असे सांगण्यात येत आहे.
जमशेदपूर : प्रम माणासाला काहीही करण्यास भाग पाडतं. लोकं प्रेमापोटी कधी दुसऱ्याची हत्या करतात तर कधी आपल्या प्रियकराची. यामागे त्यांच्या प्रेमाच्यामध्ये कोणीच येऊ नये असा या लोकांचा उद्देश असावा. परंतु भारतातील एका भागात एका प्रियकराने प्रेमापोटी स्वत:चीच हत्या केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केली, असे सांगण्यात येत आहे.
जमशेदपूरच्या साकची पोलिस स्टेशन अंतर्गत परिसरातील भाजी मंडीमध्ये असलेल्या भाजपा मंडळाच्या कार्यालयात सुरंजन मिश्रा (वय 43) यांनी आत्महत्या केली आहे.
पोलिस घटनास्थळी पोहचले असता असे पाहिले गेले की, तो या कार्यालयातील सोफ्यावर पडलेला होता आणि त्याचा मोबाईल समोर ठेवला होता. त्याचवेळी त्याच्या हातात एक पिस्तूल देखील होती.
पोलिसांकडून असा संशय व्यक्त केला जात आहे की, त्याने आपल्या गर्लफ्रेंडशी व्हिडीओ कॉलवर बोलताना स्वत: ला गोळी मारुन घेतली. या घटनेची माहिती मिळताच सिटी एसपी सुभाषचंद्र जाट घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पोलिसांनी घटनास्थळाला सील केलं आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी करत आहे. सध्या याचा रिपोर्ट अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही.
सध्या पोलिस आत्महत्या किंवा खून या दोन्ही बाजूने या व्यक्तीच्या मृत्यूचा तपास करत आहेत. त्याचवेळी मृताचे मामा धनंजय यांनी सांगितले की, सुरंजन हा बिहारचा रहिवासी आहे आणि तो जमशेदपूर येथे त्याच्याबरोबर कलेक्शनचे काम करत होता.
तो अविवाहित आहे, परंतु त्याचे बिहारमधील एका मुलीवर प्रेम आहे. परंतु ती मुलगी सुरंजनबरोबर राहायला तयार नव्हती, यामुळे सूरंजन खूप अस्वस्थ व्हायचा.
धनंजय यांनी सांगितले की, सुरंजन आणि त्याच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टीवर चर्चा होतं होती. त्यामुळे धनंजय यांना संशय आहे की, कदाचित तो या मुलीमुळे अस्वस्थ झाल्याने त्याने स्वत: ला गोळी झाडली असावी.
या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या या मृत व्यक्तीकडे हे पिस्तूल कोठून आले यावरून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जरा या पिस्तुलाबद्दल काही माहिती मिळाली तर कदाचित ही हत्या आहे की, आत्महत्या हे उघड होईल आणि त्या दिशेने पोलिस आपली केस पुढे नेतील.