प्रवाशाने बूक केली ओला कॅब, मेसेजवर ड्रायव्हरचं नाव वाचतात बुकिंग केलं रद्द... नेमकं काय घडलं?
Viral News : सोशल मीडियावर सध्या एक किस्सा चांगलाच व्हायरल झाला आहे. एका प्रवाशाने ऑनलाईन कॅब बूक केली. त्यानंतर त्याला बुकींचा मेसेज आला. पण मेसेजवर ओला ड्रायव्हरचं नाव वाचतात प्रवाशाने बुकिंग रद्द केलं. याचं कारण हैराण करणारं आहे.
Viral News : रेल्वे किंवा बसने प्रवासाला पहिलं प्राधान्य दिलं जातं. पण रेल्वे, बसला गर्दीला असल्यावर टॅक्सी प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. अनेकवेळा टॅक्सी मिळत नाही, किंवा टॅक्सीचालकांकडून नकार दिला जातो. यावर पर्याय म्हणून ओला, उबेर कॅब (Ola-Uber Cab) सुरु झाली. प्रवाशांचाही याला उंदड प्रतिसाद मिळतोय. मोबाईलच्या एका बटणावर ओला किंव उबेर कॅब आपल्या दारात येऊन उभी राहते. शिवाय एसी असल्याने आरामदायी प्रवासही होतो. त्यामुळे अनेकजण ओला-उबेर प्रवासाला पसंती देतात. पण यातही काही समस्या आहेत. अनेकवेळा प्रवाशांकडून बुक केलेली कॅब रद्द केली जाते. याची कारणंही वेगवेगळी आहेत. पण सध्या एक कारण फारच चर्चेत आहे.
कॅबचं बुकिंग केलं रद्द
एका प्रवाशाने ऑनलाईन कॅब बूक (Online Cab Booking) केली. त्यानंतर त्याला बुकींचा मेसेज आला. पण मेसेजवर ओला ड्रायव्हरचं नाव वाचतात प्रवाशाने बुकिंग रद्द केलं. याचं कारण हैराण करणारं आहे. अनेकांना त्या प्रवाशाने कॅब का रद्द केली, केवळ ड्रायव्हरचं नाव वाचून कोण कॅब रद्द करतं का? असे प्रश्न पडले आहेत. हे प्रकरण कर्नाटकमधलं आहे. एाक व्यक्तीने ओलावर कॅब बूक केली. बुकिंगचा मेसेज त्याच्या मोबाईलवर आला. पण मेसेज वाचतात प्रवाशाचा चेहरा पांढराफट्टक पडला. त्याने तात्काळ कॅबची बुकिंग रद्द केली.
काय होतं मेसेजमध्ये?
प्रवाशाच्या मोबाईलवर जो मेसेज आला होता, त्यात लिहिलं होतं, 'यमराज तुमच्या लोकेशवर पोहोचला आहे आणि तुमची वाट पाहात आहे, गाडीचा क्रमांक KA07A5045 हा आहे' या मेसेज वाचताच प्रवाशाने कॅबचं बुकिंग रद्द केलं. त्या मेसेजचा स्क्रिनशॉट काढत प्रवाशाने तो सोशल मीडियावर शेअर केला. वास्तविक प्रवाशाने जी कॅब बूक केली होती. त्या कॅबच्या चालकाचं नाव 'यमराज' असं होतं.
ही पोस्ट इन्स्ट्राग्रावर प्रचंड व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर ही पोस्ट @timepassstruggler या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला कॅप्शन देण्यात आला आहे. 'यमराज आला आहे आणि नर्कात जाण्यासाठी सज्ज आहे'. ही पोस्ट 17 जूनला सोशल मीडियावर शेअर करण्यात आली असून आतापर्यंत तब्बल 3 कोटी 82 लाख लोकांनी ती वाचली आहे. तर 7 लाख 16 हजार लोकांनी लाईक केली आहे. अनेकांनी ही पोस्ट शेअर देखील केलीय. पोस्टवर युजर्स मजेशीर कमेंटही करत आहेत. आतापर्यंत 37 हजार कमेंटस आल्य आहेत.
एका युजरने म्हटलंय, चेन्नईत माझ्यासोबतही अशीच घटना घडली होती, सूर्यकुमार नावाच्या या यूजरने आपला अनुभव शेअर केला आहे. मी सुद्धा कॅब बूक केली होती, आणि त्या कॅबच्या ड्रायव्हरचं नावही यमराज होतं. पण त्याने सुरक्षित मला माझ्या इच्छित स्थळी पोहोचवलं. आशी बेजाई नावाच्या यूजरने यमराजापासून कोणी वाचू शकणार नाही असं म्हटलंय.