मुंबई : तुम्ही जंगल सफारी कधी केली असाल किंवा कधी नॅशनल पार्कमध्ये गेले असाल, तेव्हा तुम्हाला नेहमीच एका प्राणी सुंदर किंवा क्युट वाटले असणार ते म्हणजे हरीण. तुम्ही तांबूस सोनेरी रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे चट्टे असलेला हरीण पाहिला असणार, तो दिसायला आकर्षक आणि मनमोहक असतो. परंतु तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या हरणाला पाहायला आवडेल का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील काजीरंगा नेशनल पार्कमध्ये एक पांढऱ्या रंगाचा हरीण पाहायला मिळाला जो खूप मोहक आहे. खरेतर याचा फोटो पाहिल्यानंतर लोकांना विश्वासच बसत नव्हता की, हा हरीण आहे म्हणून, कारण आपल्याकडे पांढरे हरीण पाहायला मिळत नाहीत.


IFS ऑफिसर सुंशाता नंदा ने ट्वीटरवर या फोटोला शेअर केले आहे. हा फोटो जयंत कुमार सरमा नावाच्या व्यक्तीने टिपला आहे. ज्याला नेटकऱ्यांकडून खूप पसंती मिळाली आहे.



फोटो टॅग करताना IFS ऑफिसर सुंशाता नंदा यांनी ट्वीटरवर लिहिले की, हा काजीरंगा नेशनल पार्कमधील रेअर हरीण आहे. काझीरंगा नॅशनल पार्कचे डीएफओ रमेश गोगोई म्हणाले की, हा दुर्मिळ पांढरा हरीण काही दिवसांपूर्वी उद्यानात प्रथमच दिसला होता, जो उद्यानातून क्वचितच बाहेर पडतो आणि इतर तपकिरी हिरणांसह फिरतो.


डीएफओ रमेश गोगोई यांनी सांगितले की, या हरणाचा पांढरा रंग हा पूर्णपणे अनुवांशिक आहे. जे जीनच्या बदलांमुळे होते. ते पुढे म्हणाले की, काझीरंगा मधील एकूण 40 हजार हरणांपैकी केवळ एक-दोन अशा प्रकारचा दुर्मिळ पांढरा हरीण सापडतो.