नवी दिल्ली : सहावेळा ग्रॅंडस्लॅम विजेती भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने आपला खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तीने नवीन ऑलंपिक किट परिधान केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या छोट्या क्लिपमध्य़े ती अमेरिकी रॅपर डोजा कॅटच्या 'किस मी मोर' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केल्या गेलेल्या या व्हिडिओला जगभरातील लोकांनी पसंती दिली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)


डान्स करताना सांगितले A चा अर्थ


या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सानियाने म्हटले की, माझ्या नावातील A चा अर्थ माझ्या आयुष्यात बरंच काही आहे. म्हणजेच अग्रेशन, ऍंबिशन, अचीव, अफेक्शन. ३४ वर्षीय सानियावर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.


टोकिओ ऑलंपिक खेळांचे आयोजन 23 जुलै पासून होणार आहे. सानिया ऑलंपिकमध्ये अंकिता रैनासोबत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सानियाची ही 4 थी ऑलंपिक असणार आहे.