Snake vs Boy: काही घटना अशा असतात ज्या अविश्वसनीय असतात. अशाच एका घटनेची सध्या चांगलीच चर्चा आहे. एका 20 वर्षांच्या तरुणाला तब्बल 8 वेळा साप चावला (Snake Bite). उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) आगरा (Aagra) इथली ही घटना आहे. तर रजत चाहर (Rajat Chahar) असं या तरुणाचं नाव आहे. रजतला गेल्या 15 दिवसात तब्बल 8 वेळा सापाने चावा घेतलाय. यामुळे तो दहशतीच्या छायेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदा ही घटना रात्रीच्यावेळी घडली. रजत आपल्या कुटुंबासह घरात झोपला असताना त्याच्या पायाला सापाने चावा घेतला. अनकुचीदार वस्तूने टोचल्यासारखं जाणवल्याने रजत उठला तेव्हा त्याला बाजूने साप जाताना दिसला. रजतने तात्काळ आरडाओरडा करत कुटुंबातील इतरांना जाग केलं. रजतच्या पायातून रक्त येत असल्याचं पाहातच त्याला तात्काळ उपचारांसाठी डॉक्टरकडे नेण्यात आलं. 


तात्काळ उपचार मिळाल्याने सुदैवाने रजतचा जीव वाचला. पण हा प्रकार इथेच थांबला नाही. रजत आणि त्याचं कुटुंबिय आता दहशतीच्या छायेत जगतंय. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार 6 सप्टेंबरनंतर दर दोन ते तीन दिवसांनी रात्री रजत झोपेत असताना साप येतो आणि त्याला डसतो. 


सापाच्या डसण्याने रजतच्या पायातून रक्त येतं आणि त्याचं कुटुंबियं त्याला डॉक्टरकडे घेऊन जाता. गेल्या पंधरा दिवसात तब्बल 8 वेळा रजतला सापाने चावा घेतला आहे. साप कुठून येतो आणि कुठे जातो याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण अद्यापही याचा शोध लागलेला नाही. सातत्याने घडणाऱ्या या घटनेने कुटुंब प्रचंड चिंतेत असून त्यांनी मांत्रिकाचीही मदत घेतली आहे.