ब्रिटिशांच्या अत्याचाराचा पुरावा! अधिकाऱ्यांसमोर बसण्यासाठीही भारतीयांना घ्यावी लागायची परवानगी?
British Certificates: भारत देशावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले आणि त्यानंतर आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या राजवटीत अनेक कायदेकानून होते. सध्या त्यातील एक कायदा सगळीकडेच व्हायरल होतो आहे.
British Certificates: भारत देशावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले आणि त्यानंतर आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या राजवटीत अनेक कायदेकानून होते. सध्या त्यातील एक कायदा सगळीकडेच व्हायरल होतो आहे. याचे निमित्त आहे ते म्हणजे एक व्हायरल होणारं सर्टिफिकेट. या सर्टिफिकेटवरून (Certificates) असं समजते की, ब्रिटिशांच्या पुढेही बसण्याची परवानगी घ्यावी लागत होती. सध्या सोशल मीडियावर हे सर्टिफिकेट सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच या सर्टिफिकेट्सचीच (Viral Certifictes) चर्चा होते आहे. नक्की काय आहे या सर्टिफिकेटमध्ये चला जाणून घ्या या लेखातून की नक्की हे सर्टिफिकेट होतं तरी काय?
मध्यंतरी जुन्या बिलांचा ट्रेण्ड हा काही केल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Viral Old Bills) व्हायरल होतो आहे. त्यामुळे सध्या जुन्या गोष्टींचा ट्रेण्ड सगळीकडेच व्हायरल होतो आहे. त्यात आता अजून एक सर्टिफिकेट सगळीकडेच व्हायरल होऊ लागले आहे. त्यात आता या सर्टिफिकेटनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे.
आपल्याला सर्टिफिकेट्स हे कधी मिळतात जेव्हा आपण कुठलीतरी डिग्री पुर्ण करतो तेव्हा किंवा आपण कुठलीतरी मोठी कामगिरी करतो तेव्हा. परंतु हे जे सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ते कुठल्या चांगल्या कामगिरीसाठी नाही तर एकप्रकारे हे सर्टिफिकेट म्हणजे अत्याचार आणि गुलामीचे दुरसे उदाहरणंच आहे.
इंग्रजांच्या काळात तेव्हा भारतीय लोकांना त्यांच्या अधिकाऱ्यांपुढेही बसण्याची परवानगी घ्यावी लागत होती. हे सर्टिफिकेट त्याचंच आहे. इंग्रजांनी भारतीयांवर अनेक अत्याचार केले होते ज्याची कैक उदाहरणं देता येतील. त्यातीलच हे एक उदाहरणं म्हणता येईल. एका युझरनं हे सर्टिफिकेट शेअर केले आहे ज्यात ब्रिटिशांसमोर (British) बसण्यासाठी लागणारं प्रमाणपत्र आहे. काही नामवंत लोकांनाही हे प्रमाणपत्र शेअर केलं आहे. यात तुम्ही पाहू शकता की ही तारीख 1887 मधील आहे जेव्हा ब्रिटिश राजवटीला सुरूवात होऊन बरीच वर्षेही झाली होती. या सर्टिफिकेटमध्ये आपण हेही पाहू शकतो की या सर्टिफिकेटमध्ये एका भारतीयानं ब्रिटिश अधिकांऱ्यापुढे बसण्याची परवानगी मागितली होती जी अप्रुव करण्यात आली आहे.
दिल्ली (Delhi) जिल्ह्याच्या वतीने जुलै 1887 मध्ये शेड पार्षद यांचा मुलगा राम नरसीम यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यावर तुम्ही पाहू शकता की एक रीतसर शिक्काही मारण्यात आला आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यासमोर भेटण्यासाठी भारतीयांना हे प्रमाणपत्र असल्याशिवाय खुर्चीवर बसण्याची परवानगी नव्हती, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार कळते.