मुंबई : बातमी आहे एका व्हायरल व्हीडिओची. एक व्यक्ती पत्नी आणि बाळासोबत बाईकवरून फिरायला चालले होती. त्यावेळी मागून आलेल्या कारनं बाईकला जोराची धडक दिली. या जोरदार धडकेत बाईकवरील दोघेजण खाली कोसळले. मग पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा. (viral polkhol fact check bike accident video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्यक्ती बाईकवरून आपल्या पत्नी आणि बाळासोबत कामासाठी बाहेर चालले होते. त्याचवेळी मागून आलेल्या बेदरकार कारनं पुढे जाण्याच्या नादात त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कारचालक प्रचंड वेगानं पुढे निघून गेला. वेगात असल्याने बाईकला थोडीशी धडक फारच महागात पडली.


धडकेमुळे या बाईकस्वाराचा बॅलन्स बिघडला. त्यावेळी मागे बसलेली याची पत्नी आणि बाळ खाली पडलं.  समोरून भलामोठा ट्रक वेगानं येत होता. हे दोघे खाली कोसळण्याची वेळ आणि ट्रक समोरून येण्याची वेळ एकच होती. पण काळ आलेला नव्हता, कारण शेवटी आई ती आईच. 


बाईकवरून पडली तरी या आईनं आपल्या बाळाला घट्ट पकडून ठेवलं. एवढंच नव्हे तर वेळीत तिनं पटली मारल्यानं ट्रकखाली जाण्यापासून दोघेही थोडक्यात बचावले. 


या दोघांनी मृत्यूला चकवाच दिलाय. या आईनं बाळाला सोडलं असतं तर काय झालं असतं याचा विचार केला तरी हृदयाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. या भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून, दुसऱ्याची चूक या बाईकस्वाराच्या जीवावर बेतली असती. त्यामुळे गाडी चालवताना सावधगिरी बाळगा.