उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. मात्र त्यातील प्रत्येक व्हीडिओ हा खराच असतो असं नाही. असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय. या व्हीडिओमध्ये पाण्यावर दगड तरंगताना दिसतोय. हा दगड महाराष्ट्रात सापडला आहे असा दावा आहे. पाण्यावर तरगंत असल्याने हा दगड चम्तकारित असल्याचा म्हटलं जात आहे. तेसच  हा दगड रामसेतुचा असल्याचा दावा या व्हीडिओत केला जातोय. (viral polkhol fact check The stone floats in the water)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा तरंगणारा दगड योगायोगाने रामनवमीच्या दिवशी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडिवली गावातील गड नदीत विलास यांना सापडल्याचं समोर आलं. मात्र हा दगड खरच रामसेतुचा आहे की नाही, हे आम्ही पडताळून पाहिलं. 



काय खरं काय खोटं? 


हा दगड रामसेतुतील असल्याचा दावा केला गेला. त्यामुळे आम्ही हा दगड खरंच चम्तकारिक असून रामसेतुतील आहे का, हे जाणण्याचा प्रयत्न केला. यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली. त्यानंतर या दगडामागील खरं सत्य समोर आलं. 


हा दगड रामसेतुतील आहे, असा दावा करता येत नाही. हा सच्छिद्र दगड असून, याची उत्पत्ती ही ज्वालामुखीच्या लावा रसातून झाली. या दगडाचं शास्त्रीय नाव प्युमीस स्टोन असं आहे. हे दगड गुजरात आणि तामिळनाडूत मोठ्या संख्येने आढळतात.  


आमच्या पडताळणीत हा दगड महाराष्ट्रातील असल्याचा दावा खरा ठरला. पण हा दगड रामसेतुचा असल्याचा दावा खोटा ठरलाय.