Gen Z कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी असणारं वर्तन आणि आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्याची त्यांची क्षमता यासंदर्भातील एका महिलेने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हरनिध कौर यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, त्यांचे बरेच सहकारी आता Gen Z कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यावरुन नाखूष आहेत. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता किंवा कौशल्ये नाहीत असा विषय नाही तर तर कामाच्या ठिकाणी त्यांच्या वागणुकीमुळे आणि सामाजिक संवादामुळे ते नाराज आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरनिध कौर यांच्या मते, Gen Z कर्मचारी उद्धट असून, त्यांच्यासह काम करणं अशक्य आहेत. कामाच्या ठिकाणी मूलभूत शिष्टाचारही ते पाळत नाहीत. त्यांनी सांगितलं आहे की, "माझे अनेक मित्र आता Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवत नाही आहेत. ते आपल्या कामात हुशार नाहीत म्हणून नाही तर ते उद्धट, काम करण्यास कठीण असतात. त्यांना आपल्या सहकाऱ्यांशी कसं वागावं हे माहिती नसतं. प्रामाणिकपणे त्यांचा बचाव कऱणं फार कठीण असतं".


फॉलो-अप पोस्टमध्ये, त्यांनी पिढ्यानपिढ्याचे विभाजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा उल्लेख केला, ज्याने एक सामान्य निराशा सांगितले आहे. "एका व्यक्तीने हे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केला, त्याने या भावना शेअर केल्या आहेत. ते प्रत्येकाने त्यांच्या भावनांसाठी जागा तयार करावी आणि त्यांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा करतात. परंतु जर तुम्ही त्यांना इतर कोणाची काळजी घेण्यास सांगितले तर ते त्यांच्यासाठी खूप काम आहे," असं त्या म्हणाल्या.



या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केली असून नवा वादच पेटला आहे. काहींनी या मतावर सहमती दर्शवली असून, काहींनी मात्र आपला आक्षेप नोंदवला आहे. 


"मोठ्या प्रमाणात सहमत. त्यांच्यात हक्काची भावना खूप जास्त आहे!", असं एका युजरने सांगितलं. एकाने म्हटलं आहे की, "ही वस्तुस्थिती आहे, त्यांना वाटते की ते जगाचे मालक आहेत. ते फार उद्धट आहेत". "माझ्या स्वतःच्या टीममध्ये मी स्वतःही याचा सामना केला आहे - आणि जेव्हा तुम्ही एचआरमध्ये असता तेव्हा हे सर्व अधिक आव्हानात्मक असते," असा अनुभव एका युजरने शेअर केला आहे. 


दरम्यान काहींनी मात्र याच्याशी असहमत असल्याचं सांगितलं आहे. "मी हेच बुमर्स आणि मिलेनियल्ससाठी म्हणू शकतो ज्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना योग्य पगार द्यायचा नाही, त्यांचे स्वतःचे जीवन नाही, प्रत्येकाने शोषण झाल्याप्रमाणे काम करावं आणि बहुधा विविधतेबद्दल असहिष्णु आहेत. नवीन पिढीला वर्क लाईफ बॅलन्स हवा आहे आणि जुन्या लोकांना त्याचा तिरस्कार आहे आणि कोणीही काहीही प्रश्न विचारू इच्छित नाही," असं एक युजर म्हणाला आहे. 


"ही काही विशिष्ट पिढीची समस्या नाही. मी अनेक gen z सह काम केलं आहे आणि बहुतेक खूप मेहनती आहेत. होय काहींना सामोरे जाणे कठीण आहे परंतु अशा वयोगटाकडून अपेक्षा केली जाऊ शकते," असं एक नेटकरी म्हणाला आहे. 


"हे दुर्दैवी आहे. आमच्या पिढीला ज्या गोष्टींची फारशी पर्वा नव्हती त्या गोष्टींबद्दल त्यांना मनापासून काळजी वाटत असली तरी. इतर सहकाऱ्यांशी कसे वागावे हे माहित नाही हे वैयक्तिक मत असू शकते...? किंवा हा ट्रेंड आहे?" असं मत एकाने मांडलं आहे.