लोकांचा विचार न करता रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं लिहिला प्रेमाचा अर्थ, म्हणाला, `प्रेम हे...`
Viral Rickshaw Message on Love: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका मेसेजची. रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं प्रेमाबद्दल लिहिलं असं काही की ते पाहून नेटकरी प्रचंड खूश झाले आहे. नक्की काय आहे या संदेशात पाहाच...
Viral Rickshaw Message on Love: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. त्यातून सध्या ट्विटरवर असाच एक व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात एका रिक्षावाल्यानं चक्क आपल्या रिक्षाच्या मागे प्रेमाचा अर्थचं लिहिला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. आपण कायमच पाहत असतो की ट्रकच्या मागे, गाडीच्या मागे किंवा रिक्षाच्या मागे, टॅक्सीच्या मागे काही ना काहीतरी लिहिले हे असते. त्यातून त्यातला अर्थ हा आपल्याला कायमच हसवतो. कधी कोण तिथे काय लिहिलं याचाही काही नेम नाही. त्यामुळे सध्या व्हायरल होणाऱ्या या फोटोनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी आपण पाहू शकतो की यावेळी त्याच्या दृष्टीनं प्रेमाचा अर्थ हा इतका वेगळा आहे की वाचून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या लेखातून आपण या रिक्षावाल्यानं लिहिलेल्या या हटके मेसेजबद्दल जाणून घेणार आहोत.
यावेळी ट्विटरवर हा फोटो जोरात व्हायरल होतो आहे. यावेळी @samar11 या अकांऊटवरून हा फोटो जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोखाली नेटकरी जोरात कमेंट्सही करताना दिसत आहेत. या रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं लिहिलं आहे की, ''प्रेम हे पार्कमध्ये मनसोक्तपणे फिरावं असं आहे.'' त्यापुढे लिहिलंय की, ''ज्युरासिक पार्क''.
याचा एकमेकांशी काय संबंध आहे याची काही कल्पना कोणालाच लागत नाहीये. परंतु या फोटो खाली नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्सही केल्या आहेत. यावेळी 86 हजारापेक्षा जास्त लोकांनी या फोटो पाहिला आहे तर त्याला 1.5 हजार लोकांनी लाईक केले आहे. सध्या याची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अनेकांनी हा फोटो चांगलाच व्हायरल केला आहे.
हेही वाचा : नाना पाटेकर यांनी The Vaccine War साठी किती मानधन घेतलं? म्हणाले...
यावेळी या अकांऊटवरून शेअर केलेल्या युझरनं लिहिलंय की, ''पाहा ही आहे रिक्षावाला आणि त्यांचे तत्त्वज्ञान''. सध्या या फोटोखाली भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. युझर्सनी भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. एकानं लिहिलंय की, ''या रिक्षांच्या मागे लागणाऱ्या फोटोंचे प्रदर्शन भरवा. मी पैसे देतो'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''प्रेमच ज्युरासिक पार्क आहे.'' सध्या अशा काही भन्नाट व्हायरल होणाऱ्या पोस्टची चर्चा असते तेव्हा तुम्ही अशा रिक्षात बसाल का?