Video Viral Car Insurance: कधी आपल्या हातून कोणती गोष्ट घडेल काय सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की एक व्यक्ती आपली गाडी जाणूनबजून फोडते आहे आणि ही गाडी काही साधी सुधी नाही तर चक्क टाटा पंच आहे. कार इन्शुरन्स (Car Insurance) मिळावी म्हणून या पठ्ठ्यानं असा पराक्रम केला आहे. पण नक्की या व्यक्तीती ही मजबुरी होती का हे त्यानं मुद्दाम केलं आहे हे तुम्हाला व्हिडीओ (Video) पाहूनच कळल. सध्या या व्हिडीओनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. नक्की या व्यक्तीचं असं कायं बिनसलं की त्यानं चक्क इतकं मोठं पाऊल उचचलं हे कळायला मात्र तरीही काही मार्ग नाही. परंतु हा व्हिडीओ (Car Viral Video) पाहून अनेकांना आपलं हसू आवरता आलं नाही. (viral video a tata punch car own breaks his car intenionally to get insurance for car)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाडीच्या मालकानं असं सांगितलं आहे की, या गाडीला खरोखरच तुम्ही अजून ठोका, म्हणजे तुम्हाला क्लेम (Claim) मिळेल. तेव्हा जाणून घेऊया की, नक्की या पठ्ठ्यानं असं केलं तरी काय, सध्या एक व्हिडीओ सगळीकडे जोरात व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये (Car Break Video) गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाल्याचा पाहायला मिळत आहे. या मालकानं असं सांगितलं आहे की स्वत:हून त्या एजंटनं असं सांगितलं की, तुम्हाला जर का इन्शुरन्स हवं असेल तर तुम्हाला गाडीचं अजून नुकसान करावं लागेल त्याप्रमाणे या गाडीचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


या गाडीला अनेक स्क्रॅच पडले त्याचसोबत नंतर ड्रायव्हरनं ही गाडी पुन्हा खांबाला टाकली आणि त्यानंतर त्या कारची संपुर्ण दुरावस्था झाली. त्या एजंटचं बोलणं त्यानं गांभिर्यानं घेतलं आणि कारची पुर्णत: दुरावस्था झाली. सध्या या व्हिडीओनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओवर (Viral Video Car Owner Trolled) अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सध्या या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी हास्याचे फव्वारे सोडले आहेत. यामुळे सगळीकडेच या मालकाला ट्रोलही केलं जाते आहे. तुम्ही असा प्रकार करण्यापुर्वी शंभर वेळा विचार करा कारण तुम्हालाही असं काही करणं महागात पडेल.  



प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपणही मोठी आलिशान कार घ्यावी त्यातून आपण आपल्या कारलाही खूप जपतो. परंतु असा प्रकार पाहून कारप्रेमींनीही चीड व्यक्त केली आहे.