माँ तुझे सलाम! 9 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला जवान निघाली देशसेवेसाठी... डोळ्यात पाणी आणणारा Video
Heartbreaking Video : देशसेवेसाठी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला पतीकडे ठेऊन बीएसएफची एक महिला जवान निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भावूक करणार हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणतो. महिला जवान आणि तिच्या मुलाचा भावनिक निरोप हृदय पिळवटून टाकणारा आहे.
Heartbreaking Video : आपल्या जीवनात आईचं स्थान खूप महत्वाचं आहे. आईशिवाय जीवनाची अपेक्षा करता येत नाही. आई या नावात देव स्वतः वास करतो. आई आपल्या मुलांच्या सुखासाठी काहीही करायला तयार असते. मुलावर कोणतंही संकट आलं तरी आई मुलाचं रक्षण करण्यासाठी सदैव तयार असते. आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ पाहाणाऱ्याला भावूक करतो.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
देशसेवेसाठी आपल्या 9 महिन्यांच्या मुलाला सोडून जातानाचा बीएसएफच्या (border security force) एका महिला जवानाचा हा व्हिडिओ प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. महिला जवान आणि तिच्या मुलाचा भावनिक निरोप हृदय पिळवटून टाकणारा आहे. आपले सैनिक डोळ्यात तेल टाकून 24 तास सीमेवर रक्षण करत असतात. अनेक महिने आपल्या घरापासून आणि कुटुंबांपासून दूर असतात. वर्षातील काही दिवसच त्यांना आपल्या कुटुंबाला भेटण्याची सुट्टी मिळते. पण पुन्हा आपल्या कुटुंबाला सोडून त्यांना देशसेवत रुजू व्हावं लागतं.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (BSF) तैनात असलेली एक महिला जवान आपली सुट्टी संपवून ड्युटीवर निघतानाचा हा व्हिडिओ आहे. पण ट्रेनमध्ये चढताना तिच्या डोळ्यात अश्रु तरळतात. अवघ्या 9 महिन्यांच्या बाळाला सोडून ती ड्युटीवर निघालेली पाहायला मिळतेय. ट्रेनमध्ये चढताना बाळ तिच्या कुशीत दिसतंय. पण जशी ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन निघते, ती आपल्या बाळाला पतीकडे सोपवते. हा क्षण प्रत्येकाला भावूक करणारा आहे.
मुलाला सोडून जाता ती बहादुर महिला जवान आपल्या अश्रुंवर नियंत्रण ठेवताना दिसतेय. हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीच आहे. पण सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ पाहून युजर्स भावूक
ट्विटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंटही केल्या आहेत. एका युजर्सने या मातेला सलाम केला आहे. एका युजरने लिहिलंय, आपल्या प्रिय भारतासाठी आपलं जीवन समर्पित करणारे जवान नेहमीच सुरक्षित, आनंदी आणि समृद्ध होवो. त्या सर्वांना खूप खूप सलाम. जय हिंद! तर एका यूजरने लिहिलंय, 'या जगातील सर्वात महान योद्धा ही आई आहे.'