Indian Army Jawan Welcomed With Red Carpet: भारतीय लष्करी जवनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लष्करात सेवा करणारा हा जवान घरी आल्यानंतर घरच्या मंडळींनी अगदी रेड कार्पेट टाकून आपल्या लाडक्या लेकाचं स्वागत केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच घरी परतलेल्या आपल्या लेकाच्या स्वागतासाठी घरच्यांची लगबग आणि त्यांनी केलेलं स्वागत पाहून अनेकांची डोळे पाणावले आहेत. 


कोणी शेअर केला आहे हा व्हिडीओ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले पवन कुमार मेजर जनरल (निवृत्त) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. "भारतीय लष्कारामध्ये सहभागी झालेल्या तरुणाला पाहून गावकरी, नातेवाईकांना वाटणारा अभिमान पाहा. नाव, खाल्लेलं अन्न आणि निशाणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तो लढणार. आपल्याकडे असे उत्साही आणि प्रेरणा देणारे तरुण असल्यावर कोणताही देश अपयशी ठरु शकतो का?" अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.


व्हिडीओमध्ये काय आहे?


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये घरासमोरच्या ऊसाच्या शेतांच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर एक कार येऊन थांबताना दिसते. या गाडीमधून उतरलेला एक लष्करी जवान समोरच उभ्या असलेल्या व्यक्तीला मिठी मारतो. त्यानंतर हा तरुण घरात प्रवेश करण्यासाठी जातो त्यावेळी घराच्या गेटसमोर रेड कार्पेट टाकलेलं दिसतं. कार्पेटवर चालण्याआधी हा तरुण सॅल्यूट करतो. त्यानंतर तो परेडमध्ये चालतात त्याप्रमाणे या कार्पेटवरुन चालत जात आईला मिठी मारतो. त्यानंतर हा तरुण जमीनीवर माथा टेकवून प्रणाम करतो. या तरुणाचे वडील आणि गावकरी त्याच्यावर फुलांचा वर्षाव करतात. त्यानंतर हा तरुण काही पावलं मागे जातो आणि आपल्या वडिलांनी तसेच भावाला सॅल्यूट करतो. त्यानंतर या तरुणाची आई आणि बहीण त्याला मिठाई खाऊ घालून त्याचं तोंड गोड करतात.



कौतुकाचा वर्षाव


हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी या तरुणाबरोबरच त्याचं अनोख्या पद्धतीने स्वागत करणाऱ्या घरच्यांचं, गावकऱ्यांचही कौतुक केलं आहे. आपल्या गावाबद्दल, मातीबद्दल सन्मान राखणाऱ्या या तरुणाला सलाम असं अनेकांनी म्हटलं आहे.