मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. जे काही मिनिटांत व्हायरल होतात. लोक आपल्या मित्रपरिवाराला देखील अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. यांपैकी काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे आपल्यासाठी उदाहरण म्हणून कामाला येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो धोकादायक आहे. एवढेच नाही तर हा व्हिडीओ आपल्यासर्वांसाठी एक उदाहरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कार CNG पंपावर थांबली आहे आणि त्यामध्ये CNG भरली जात आहे. CNG भरताना त्याचा ड्रायव्हर हा बाहेर उभा असतो आणि बघता-बघता या CNG गाडीचा स्फोट होतो.


स्फोटाचा आवाज ऐकून इंधन स्टेशनचे कर्मचारी सीएनजी फिलिंग मशीन बंद करण्यासाठी धावतात. जेणेकरून मोठी दुर्घटना घडू नये. मात्र, ते पाहिल्यावर वरून काहीतरी गाडीच्या छतावर पडल्याचेही दिसते.


नशीबाने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही किंवा कोणाचेही प्राण गेले नाही. परंतु जरा विचार करा जर या गाडीत कोणी बसलं असतं तर ते किती महागात पडलं असतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे. तुम्ही देखील गाडी चालवत असाल किंवा तुमच्याकडे CNG गाडी असेल, तर हे नेहमी लक्षात ठेवा की, यामध्ये इंधन भरताना गाडीच्या आता कोणीही बसु नये. यामुळे तुम्ही जीवितहानी होण्यापासून वाचवू शकता.


व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर आतापर्यंत 13 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तसेच त्याला 57 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच सोशल मीडिया यूजर्सही यावर कमेंट करत आहेत.