Matka Dosa Viral Video: सोशल मीडियावर कधी, काय आणि कोणत्या कारणासाठी व्हायरल होईल हे सांगता येणं कठीण. आपल्यापैकीही अनेकजण रोज अनेक व्हायरल व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर पाहत असणार. यापैकी काही व्हिडीओ हे डान्सचे किंवा मनोरंजनासंदर्भातील असतात तर काही लोकांची उडालेली फजिती दाखवतात. यापैकी प्रचंड पाहिलं जाणारं अन्य एक सेक्शनमध्ये फूडसंदर्भातील म्हणजेच खाण्यापिण्यासंदर्भातील व्हिडीओ. सध्या इंटरनेटवर फूड व्हॉगर्सचा सुळसुळाट झाला आहे. रेसिपिंमध्ये प्रयोग करणाऱ्यांची आणि हे केलेले प्रयोग चांगले असो किंवा वाईट ते सोशल मीडियावरुन शेअर करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अनेकदा हे प्रयोग पाहून अंगावर काटा येतो तर कधी कधी हा पदार्थ तर छान दिसतोय पण तो खायचा असा असा प्रश्न पडतो. असाच काहीसा गहण प्रश्न सध्या नेटकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. आणि हा प्रश्न पडलाय त्यांना मटका डोश्यासंदर्भात.


गोंधळात टाकणारा डोसा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी डोश्याची चव चाखली असेल. मग तो कधी साधा मसाला डोसा असेल, रवा डोसा असेल, शेजवाज डोसा असेल किंवा प्रायोगिक सांगायचं झाल्यास रॉकेट डोसा आणि फारच डोक्यावरुन पाणी म्हटलं तर पेपर डोसापर्यंत तुम्ही मजल मारली असेल. मात्र इंटरनेटवर सध्या मटका डोश्याची तुफान चर्चा आहे. तसं डोसा हा फारच सोज्वळ आणि पोटासाठी उत्तम पदार्थ. मात्र आजच्या नेटच्या काळात आणि त्यातही खवय्यांना काहीतरी युनिकनेसच्या जोरावर दुकानांपर्यंत आणण्यासाठी दुकानदारही वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. अशाच एका प्रयोगातून जन्म झाला मटका डोशाचा. पण हा डोसा दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच तो गोंधळात टाकणाराही आहे. 


लाखो व्ह्यूज


दीपक प्रभु नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरुन हा मटका डोसा कसा बनवला जातो यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अगदी हा मटका डोसा बनवण्यापासून ते टेबलवर सर्व्ह होईपर्यंतचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे. डोसा बनवणारी व्यक्ती आधी भाज्या चिरुन त्यामध्ये चाट मसाला, केचअप, सोया सॉस आणि इतर अनेक चविष्ट गोष्टी टाकतो. तो यामध्ये पनीरचे तुकडे आणि कोबीही टाकतो. त्यानंतर तो डोसा बनवायला सुरुवात करतो. डोसा थोडा तयार झाल्यानंतर तो त्यावर हे तयार केलेलं मिश्रण टाकतो. दुसरीकडे तो एका छोट्या आकाराच्या मडक्यामध्ये मेयोनिज टाकून तयार करतो. तयार झालेला डोशाला तो त्रिकोणी आकार देतो आणि तो डोसा या मडक्यामध्ये उभा केल्याप्रमाणे नरसाळ्यासारखा फिक्स करतो. याच डोशाला मटका डोसा असं नाव देण्यात आलं आहे. 


1 लाख 70 हजारांहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर 200 हून अधिक वेळा हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे.



नेटवर पडले दोन गट


अनेकांना ही रेसिपी आवडली असून त्यांनी हा डोसा खायची इच्छा व्यक्त केली आहे. पण काहींना हे प्रयोग उगाच केल्यासारखा वाटत असून हा डोसा नेमका खायचा कसा असा प्रश्न विचारला आहे. या डोशाची चव घेणं कठीण आहे असं म्हणणाऱ्यांनी डोसा नॉर्मली सर्व्ह करतात तसा दिला असता तरी चालला असता असं म्हटलं. तर फ्युजन फूडप्रेमींनी हा डोसा खायला नक्की आवडेल असं मत व्यक्त केलं आहे. वरील व्हिडीओ पाहून तुम्ही कोणत्या गटात आहात ते कमेंट करुन नक्की कळवा.