Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर होत असतात. यातले काही व्हिडिओ (Viral Video) विस्मरणात जातात तर काही व्हिडिओ कायमचे लक्षात राहतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल. तामिळनाडुची राजधानी चेन्नईतला (Chennai) हा व्हिडिओ आहे. शाळेतून आपल्या आईबरोबर घरी परतणाऱ्या एका चिमुरडया विद्यार्थिनीवर मोकाट गायीने हल्ला (Cow Attack) केला. लोकांनी मोठ्या प्रयत्नानंतर मुलीची गायीच्या तावडतीन सुटका केली. सुदैवाने मुलगी गंभीर जखमी झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
चेन्नईतल्या एका गावातला हा व्हिडिओ आहे.  या व्हिडिओत एक महिला आपल्या दोन मुलांबरोबर शाळेतून घरी परतताना दिसत आहे. तिच्याबरोबर एक पाच-सहा वर्षांचा मुलगा आहे तर एक नऊ-दहा वर्षांची मुलगी आहेत. एका अरुंद रस्त्याने आई आणि दोन मुलं पायी चालताना दिसत आहेत. त्यांच्या समोर एक गाय आणि एक वासरू जात असल्याचंही दिसतंय. मुलगी गायीच्या बाजूने चालत असताना अचानक गाय मागे वळते आणि त्या मुलीला शिंगाने उचलून जमिनीवर आपटते. काही कळायच्या आतच गायीने मुलीवर हल्ला केला. आसपासच्या लोकांनाी आरडाओरडा करत गाईला हाकलण्याचा प्रयत्न केला. पण गाय त्या मुलीवर हल्ला करतच राहिली.


मुलीची आई किंकाळ्या मारतानाही व्हिडिओत ऐकू येतंय. काही लोकं गायीला दगड मारून हकलण्याचा प्रयत्न करताना दिसताय. पण त्यालाही न जुमानता गायीचा मुलीवर हल्ला सुरुच होता. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर लोकांनी मुलीची गायीच्या तावडीतून सुटका केली. मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आलं. सुदैवाने मुलीला गंभीर दुखापत झाली नाही. 


या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोकाट प्राण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चेन्नई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोकाट गायीला जेरबंद केलं. तसंच गायीच्या मालकाविरुद्ध एफआईआर दाखल केली आहे. 



वृद्धावर गाढवाचा हल्ला
महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच धक्कादायक घटना समोर आली होती. कोल्हापूरमधल्या गांधीनगरमध्ये मोकाट गाढवाने दोन शाळकरी मुलींवर आणि एका वृद्धावर हल्ला केला.  हल्ल्याची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. . गाढवाच्या हल्ल्यात लक्ष्मण कुसाळे, गोपीचंद कामरा आणि मयुरी जाधव हे तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत झाल्याच्याच तर अनेक घटना आहेत.