सोशल मीडियावर (Social Media) एका व्यक्तीची सुटका केली जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ बंगळुरुमधील असून या व्यक्तीचं वय 188 वर्षीय असल्याचा दावा केला जात आहे. त्यांची एका गुहेतून सुटका करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं होतं. एक्सवर Concerned Citizen  या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. काही वेळातच व्हिडीओला 29 मिलिअनपेक्षा जास्त व्ह्र्यूज मिळाले होते. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'ही भारतीय व्यक्ती फक्त गुहेत सापडलेली नाही, तर तिचं वय 188 वर्षं असल्याचं सांगितलं जात आहे. आश्चर्यकारक'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 सेकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये दोन तरुण त्या वयस्कर व्यक्तीला चालताना आधार देत असल्याचं दिसत आहे. दरम्यान कुबड आलेली आणि पांढरी दाढी असणारी ही व्यक्ती काठीच्या सहाय्याने चालताना दिसत आहे. 


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यासंबंधी केलेल्या दाव्यांवर प्रश्चचिन्ह उपस्थि करण्यात आलं. अनेकांनी व्हिडीओत दिसणारी व्यक्ती 110 वर्षांची असून, मध्य प्रदेशातील हिंदू संत असल्याचं सांगू लागले. 



X ने पोस्टला प्रतिसाद म्हणून एक डिस्क्लेमर जारी केलं आहे. त्यात त्यांनी नमूद केलेले वय कदाचित योग्य नसावं असं सांदगितलं आहे. "चुकीची माहिती! वृद्ध व्यक्ती 'सियाराम बाबा' नावाचे हिंदू संत आहेत जे भारतातील मध्य प्रदेशात राहतात. रिपोर्टनुसार त्यांचे वय सुमारे 110 वर्षे आहे," असं एक्सवरील नोटमध्ये सांगण्यात आलं आहे. 


एक्सवर 2 जुलै 2024 रोजीच्या नवभारत टाइम्सच्या एका लेखाचा संदर्भ देण्यात आला आहे, ज्यामध्ये या व्यक्तीची खरी ओळख उघड केली आहे. अहवालानुसार, सियाराम बाबा या वृद्ध व्यक्तीचे वय 109 आहे. सियाराम बाबा या प्रदेशात लोकप्रिय आहेत आणि ते मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात राहतात.



डेटा व्हेरिफिकेशन ग्रुप, डी, D-Intent Data ने हा व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. D-Intent डेटाने एक्सवर पोस्ट केली असून सांगितलं आहे की, "हा दिशाभूल कऱणारा आहे. एका वृद्ध व्यक्तीला मदत करणाऱ्या काही लोकांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की एक 188 वर्षीय भारतीय व्यक्ती नुकत्याच एका गुहेत सापडली आहे. हे दावे खरे नाहीत, ही वृद्ध व्यक्ती 'सियाराम बाबा' नावाचे संत आहेत, जे भारतातील मध्य प्रदेशात राहतात".


एक्सवरील पोस्टमध्ये चेतावणीदेखील देण्यात आली आहे. "इन्फ्लुएन्सर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्वत: च्या दाव्यांच्या आधारे व्हिडिओ प्रसारित करत आहेत," असं सांगण्यात आलं आहे.