मुंबई : पोलीस म्हणजे कायद्याचं रक्षण करणारा माणूस. त्यामुळे कायदा मोडणारे त्याला तसे घाबरूनच असतात. त्यामुळे पोलिसही तसे नेहमीच रूबाबात असतात. जसे की आपण कोणाला घाबरतच नाही. पण, पोलिसही कधी कधी घाबरतात. आणि तेही उंदराला. कादाचीत आपणाला हे पटणार नाही. पण, हा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला नक्कीच हे पटू शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे. जो एका पोलिसाचा आणि एका उंदराचा आहे. या व्हिडिओत एक पोलिस चक्क उंदराला घाबताना दिसत आहे. या अगदी गंमतशीर व्हिडिओला सोशल मीडियावर अनेकांनी भलतीच पसंती दिली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर, अनेकांनी शेअर.


व्हिडिओतील घटना रशियातील पीटर्सबर्ग येथे घडल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिड़िओ म्हणेजे एक सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यात एक पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. कर्तव्य बजावत असताना हा पोलीस स्टेशनमधील बरॅक तपासताना दिसत आहे. दरम्यान, एक भलामोठा उंदीर त्याच्या पायाजवळून जाताना दिसतो. अचानक आलेल्या या उंदराला पाहून या पोलिसाची चांगलीच घाबरगुंडी उडते.



प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ ९ महिन्यांपूर्वीचा आहे. एप्रिल २०१७ मध्ये हा व्हिडिओ पहिल्यांदा युट्यूबवर अपलोड करण्यात आल्याची माहिती मिळते. दरम्यान, आतापर्यंत अनेकांनी या व्हिडिओची मजा घेतली आहे.