Viral Video : इथे ओशाळली माणूसकी! Reels बनवण्यासाठी कुत्र्याच्या पिल्लाच्या जीवाशी खेळ, संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक तरुण मुलगा आणि मुलगी व्हिडिओ बनवण्यसाठी कुत्र्याच्या पिलाबरोबर क्रुरता करताना दिसत आहेत
Puppy Viral Video : एकनिष्ठ, इमानदार आणि माणसाचा जीवलग मित्र म्हणजे कुत्रा. कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे अनेकजण आपल्या पाळीव कुत्र्याची काळजी घेतात. पण अनेकवेळा आसुरी आनंद मिळवण्यसाठी मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा संतापजनक प्रकार घडतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एक विकृत घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुत्र्याच्या पिल्लाला एका तरुण जोडप्याने क्रुरतेने वागल्याचं समोर आलं आहे. आपल्या मजेसाठी कुत्र्याच्या पिल्लाबरोबर दिलेल्या वागणूकीने संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरुण मुलगा आणि मुलगी लहान पिल्लाला फूटबॉलसारखं उडवतायत. तर कधी त्याचे पाय पकडून त्याला ओढत नेताना दिसत आहे. पिल्लाच्या शेपटीला पकडून त्याला हवेत उडवतानाही पाहिला मिळतंय. या प्रकाराने कुत्र्याचं पिल्लू अतिशय घाबरलेलं दिसत आहे. इतकंच नाही तर तो मुलगा पिल्लाचे मागचे दोन पाय पकडून त्याला गोल गोल फिरवतानाही दिसत आहे. केलेल्या कृत्याचा दोघांना अजिबात पश्चाताप नाही, उलट दोघंही मजा घेताना दिसत आहेत.
आईएएस अधिकारी (ias officer) अवनशी शरण (awanish sharan) यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओबरोबर त्यांनी एक कॅप्शनही लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, यात प्राणी कोण आहे? हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तुमच्या मजेसाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे, पण त्या मुक्या प्राण्याच्या जीवाचा विचार केला आहे का, असा सवाल नेटिझन्सने उपस्थित केला आहे. तर काही जणांनी या दोघांवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधले जातात
दिवाळीत मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढतात. कधी झोपलेल्या कुत्र्याच्या बाजूला बाँब फोडून त्याला घाबरवणं, किंवा कधी कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधून ते पेटवून देणं. फटाक्यांच्या आवाजाने कुत्रा घाबरून सैरावैरा पळू लागतो, आणि याचा व्हिडिओ बनवून आनंद घेतला जातो. सोशल मीडियावर मनोरंजनासाठी असले अनेक व्हिडिओ आपण पाहतो. माणसाच्या रुपातल्या अशा प्राण्यांना वेळीच शिक्षा होणं गरजेचं आहे.