हरिश मालुसरे, झी मीडिया, Viral Video on Social Media : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ असे असतात का पाहताना तुम्हाला हसू आल्याशिवाय राहत नाही. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे नवी कोरी गाडी असल्याचं दिसत आहे. चालकाने गाडी घरी आणल्यावर ती पार्क करताना जे घडलं त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  (Viral Video Dasara Muhurt car Accident viral video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?    
एक तरूण गेट उघडताना दिसत आहे, त्यानंतर एक नवी कोरी गाडी गेटमध्ये प्रवेश करते, गाडीला हार घातलेला दिसत आहे. गाडी एकदम सुरक्षितपणे आत येते आता फक्त गाडी पार्क करायची असते. मात्र चालकाला काय होत माहित नाही. चालक गाडी थेट तिथं उभ्या असलेल्या गाड्यांना धडक देत आहे. इतकंच नाहीतर गाडी एका बाजूने पूर्णपणे कलंडलेली दिसत आहे. त्यानंतक तरूण आणि  वॉचमन पळताना  दिसत आहे. एका सोसायटीच्या मेन गेटवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. 


दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन गाड्या खरेदी केल्या होत्या. त्याप्रमाणे व्हायरल व्हिडीओमधील गाडीसुद्धा दसऱ्याच्या मुहूर्तावर आणलेली आहे. मात्र हा मुहूर्त गाडी चालकासाठी चांगला ठरलेला दिसत नाही. अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. व्हिडीओमध्ये तारीख आणि वेळ दिसत आहे.



काहींचं म्हणणं आहे की चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी गाडीच्या एक्सलेटरवर पाय दिला त्यामुळे गाडीचा ताबा सुटतो आणि गाडी तिथे असलेल्या दुचाकींना धडक देते. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप काही माहिती मिळाली नाही.