Viral Video : घरी किंवा परिसरात साप (Snake) दिसल्यास त्याला मारण्याची चूक केली जाते किंवा सर्पमित्राला (SarpaMitra) बोलावलं जातं. प्रशिक्षित सर्पमित्र योग्य पद्धतीने सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. पण असे काही जण असतात जे केवळ सापाला बघण्याचे व्हिडिओ (Video) पाहून सर्पमित्र म्हणून फुशारक्या मारत असतात. साप कोणता आहे, त्याला कसं पकडायचं याची माहिती नसताना चुकीच्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करतात. यासाठी लोखंडी सळ्या, आरीचे पाते, लाकूड यासारख्या वस्तूंचा त्यांच्याकडून वापर केला जातो. पण यामध्ये कधी कधी सापाला इजा होते, किंवा सापाने दंश केल्याने स्वयंघोषित सर्पमित्राच्या जीवावर बेतू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नसतं धाडस तरुणाच्या अंगाशी
सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हायरल होत आहे. साप पकडण्याचं प्रशिक्षण नसताना एका तरुणाला नसतं धाडस करणं चांगलंच महागात पडलं. केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी या तरुणाने साप पकडण्याचा प्रयत्न केला. पण योग्य प्रशिक्षण नसल्याने सापाने त्याला दंश केला. रसेल वायपर (Russell Wiper) नावाच्या या विषारी प्रजातीच्या सापाने त्यातरुणाचा चावा घेतला. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


काय आहे व्हिडिओत
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरुण साप पकडताना दिसतोय. भंगार ठेवलेल्या एका जागेत साप दिसला. त्यानंतर हा उत्साही तरुण साप पकडण्यासाठी तिथे गेला. तरुणाने त्या डाव्या हाताने सापाची शेपटी पकडली, पण त्यानंतर सापाचं तोंड पकडण्याच्या प्रयत्नात सापाने त्याला दंश केला. यानंतरही त्या तरुणाने पुन्हा तीच चूक केली. सापाचं तोंड पकडताना त्याला दुसऱ्यांदा सापाने दंश केला. यानंतर त्याने सापाला सोडून दिलं.



तरुणाची प्रकृती गंभीर
सर्पदंश (Snakebite) केल्यानंतर तरुणाने सुरुवातीला फारसं लक्ष दिलं नाही, पण त्यानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


प्रशिक्षणाशिवाय जीव धोक्यात घालू नका
अनेक वेळा केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा मित्रांमध्ये आपण किती शूर असल्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी काही तरुण आपला जीव धोक्यात टाकत असतात. पण योग्य प्रशिक्षणाचा अभाव आणि स्थानिक सापांची योग्य माहिती नसल्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांना अनेकदा सर्पदंश झाल्याच्या घटना घडत असतात. काही वेळा साप पकडल्याचे व्हिडिओ तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात.


हे ही वाचा : सावधान! महिलांना छम्मक छल्लो, आयटम म्हणाल तर... इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा


 


इल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीच्या (Wildlife Welfare Society) सदस्यांनी दिलेल्या माहितनुसार साप पकडणं सोपी गोष्ट नाही. त्यासाठी योग्य प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. प्रशिक्षणानंतर अनुभवी सर्पमित्रांसोबत काम करावं लागतं. साप पकडणं आणि त्यावर नियंत्रण मिळवणं हे अत्यंत संवेदनशील काम आहे. व्हिडिओत दिसत असलेल्या तरुणाने जो साप पकडण्याचा प्रयत्न केला आहे तो रसेल व्हायपर नावाचा अत्यंत विषारी जातीचा साप आहे. अशी चूक इतर तरुणांनी करु नका असं आव्हान त्यांनी केलं आहे.