जेव्हा बाबा 15 दिवसांनी घरी येतात..; चिमुकलीचा हा Video पाहिला का?
Father Daughter Viral Video : बाप लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असते. त्या नात्यातील गोडवा एक मुलगी आणि वडीलचं सांगू शकतो. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Little Girl Viral Video : मुली या'पापा की परी' म्हणजेच 'बाबांची राजकन्या' असतात. मुली आणि वडिलांचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असतं. मुलांचा कायम मला एक मुलगी हवी असा सूर असतो. त्या चिमुकलीला हात घेतल्यापासून त्यांचा एक ऋणानुबंध निर्माण होतं. वडील सतत तिच्यावर प्रेमरुपी सावली घेऊन वावर असतो. मोठेपणे वडिलांसारखाच जोडीदार हवा अशी मुलींची इच्छा असते. या अशा सुंदर नात्यामुळे की काय आजही मदर्स डे पेक्षा फादर्स डे जास्त उत्साहात साजरा होतो.
बाप-लेकीचं नातं कसं असतं...
काळ बदला, नात्याचं स्वरुप बदलं पण बापलेकीचं नातं आजही तसंच आहे. बाप-लेकीचं नातं कसं असतं हे दाखविणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हृदयस्पर्शी व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. (viral video father daughter Emotional Bonding Instagram trending video social viral trends)
जेव्हा बाबा 15 दिवसांनी घरी येतात...
इन्स्टाग्रामवरील patiljee_official हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ कोटीच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकली साधारणात दीड दोन वर्षांची असेल. तिचे बाबा 15 दिवसांनी घरी आले आहे. बाबा आले हे पाहून तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ती चक्क बाबांना पाहून लाजली आणि तोंडावर हात ठेवून खाली वाकली. नंतर तुरुतुरु किचनच्या दिशेने निघाली.
पण बाबा आली ना तिचे मागे वळून आपली ते तिच्याकडे येतं आहेत ना...मग इवली इवली पायाने ती जात होती अचानक खाली बसली आणि रांग किचनमध्ये जाऊन बसली. बाबांना पाहून तिने चेहरा झाकला. पण बाबांची राजकन्या ना ती...चेहऱ्यावरील इवल्याशा बोटातून एका डोळ्यांनी ती वडिलांकडे पाहत होती.
स्वर्गसुख!
आपल्या राजकन्येला वडिलांनी कुशीत उंचलून घेतलं. तिने वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यांचा गालावर पापी दिली. सुख म्हणजे काय असतं...बाप लेकीसाठी यापेक्षा मोठं स्वर्गसुख काहीच नसतं.