नवी दिल्ली : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी खळखळून हसवणारे तर कधी अश्रू अनावर होणारे. प्राणांचे देखील बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. एक व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओ मगर आणि मासा यांच्यातील शिकारीचा आहे. मगर माशाची शिकार करायचे मनसुबे रचते मात्र ते कधी अपयशी ठरतात हे सांगणारा हा व्हिडीओ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मगर माशाची शिकर करण्यासाठी बराचवेळ दबा धरून बसते. मात्र त्या मगरीला याची जराही कल्पना नसते की आपणच या शिकारीच्या जाळ्यात अडकू. मासाच आपली शिकार करेल. मगर शिकारीसाठी पुढे जाते आणि जोराचा झटका बसतो. 


मगर आणि माशाच्या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मासा साधासूधा नाही तर चक्क करंट निघणारा मासा आहे. ईल नावाच्या या माशामधून 860 वोल्टचा करंट निघतो. त्याच माशाशी नेमका मगरीनं पंगा घेतला आणि घोळ झाला.


शिकार करणाऱ्या मगरीचीच करंट लागून शिकार झाली राव! अखेर मगरीनं तडफडून जीव सोडला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियवर खूप व्हायरल होत आहे. या मगरीची अनेकांना दया आली. तर काहींनी शिकारीचीच कशी शिकार झाली असं म्हणून हसण्याचे इमोजी देखील केले आहेत.