Video : जीवघेणी लिफ्ट! जेव्हा लिफ्टमध्ये 20 मिनिटं अडकल्या तीन मुली, त्यानंतर जे घडलं...
Viral Video : एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये 20 मिनिटं जेव्हा चिमुकल्या अडकल्या त्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
Trending Video : तुमचा आमचा काळजाचा ठोको चुकविणारा एक भयानक व्हिडिओ (Shocking Video) समोर आला आहे. 8 ते 10 वर्षांच्या तीन मुली या एका इमारतीच्या लिफ्टमध्ये (Building elevators) अडकल्या. इमारतीची लिफ्ट (lift ) अचानक खराब झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे.
नेमकं काय झालं?
लिफ्ट अचानक बंद झाल्यानं या मुली लिफ्टमध्ये अडकल्या.. या मुली प्रचंड घाबरलेल्या होत्या... आणि मदतीसाठी आरडाओरडा करत होत्या...जवळपास 20 मिनिटं हा जीवघेणा थरार सुरु होता. त्या जोरजोरात रडत होत्या, दार उघण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होत्या. पण अचानक लिफ्ट बंद झाल्यामुळे त्या घाबरल्या आता पुढे काय होणार या भीतीने त्या बैचेन झाल्या...अंगावर काटा आणणारं हे दृश्यं सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झालं आहे.
हेही वाचा - Viral Video: संतापजनक! LIVE व्हिडिओ करताना कोरियन महिलेचा मुंबईत विनयभंग
अखेर मुलींची लिफ्टमधून सुटका...
अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या मुलींची लिफ्टमधून सुटका करण्यात आली.. या घटनेनंतर मुलींच्या पालकांनी लिफ्ट मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीविरोधात आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. लिफ्टच्या देखभालीवर वर्षाला 25 लाखांहून अधिक खर्च होतो, मात्र तरीही हीच परिस्थिती असल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.दरम्यान या घटनेचा लोकांवर मनावर इतक्या परिणाम झाला की या घटनेमुळे आता सोसायटीतील लोक लिफ्टचा वापर करणे टाळत आहेत. (Viral Video Ghaziabad Girls trapped inside the lift what What happened next )
ही धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये (ghaziabad) घडली आहे. या घटनेच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर एवढंच सांगता येईल सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांनी लिफ्टच्या मेटेन्सकडे लक्ष द्यावं आणि पालकांनी मुलांना शक्यतो लिफ्टमधून एकटं सोडू नये.