गिळायच की थुंकायचं! रजनीगंधा टाकून बनवलं आईसक्रिम... व्हिडिओ पाहून लोकं भडकली
देशातील अनेक राज्यात गुटख्यावर बंदी आहे. गुटखा खाणं आरोग्यास हानीकारक आहे, यापासून लोकांनी लांब राहावं यासाठी सरकार जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन केलं. पण लोकं याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. आता तर चक्क गुटख्याचं आईसक्रिमच आलं आहे.
Viral News : आपल्या देशाला खाद्य संस्कृतीचा (Food Culture) मोठा वारसा आहे. जिल्हा बदलतो तसं खाण्याचे पदार्थ बदलतात. सोशल मीडियावर (Social Media) विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपीही (
recipe) शेअर होत असातात. यात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळे मासले वापरुन केलेले पदार्थ दाखवले जातात. सध्या अशाच एका खाद्यपदार्थाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ वाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हिडिओवर युजर्स संतापले
आईसक्रिम आवडत नाही असा क्वचितच व्यक्ती सापडेल. बाजारात अनेक प्रकाराचे, अनेक फ्लेवर्सचे आईसक्रिम (Ice Cream) उपलब्ध आहेत. स्ट्रोबेरी, वॅनिला, मँगो असे आईसक्रिमचे एक ना शेकडो प्रकारचे आईसक्रिस आहेत. पण तुम्ही कधी गुटखावालं आईस्क्रिम (Gutkha Icecream) खाल्लं आहे का? आता तुम्ही म्हणाल, असं कुठे असतं का? पण हो तुम्ही वाचतायत ते अगदी बरोबर आहे, गुटखा टाकलेलं आईस्क्रिम बाजारात आलं आहे.
सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती रजनीगंधा आणि पास-पासचा वापर करत आईसक्रिम बनवताना दिसतोय. या व्हिडिओ लोकांनी प्रचंज संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओत दिसत असल्या प्रमाणे एका व्यक्ती मोठ्या तव्यावर सुरुवातीला रजनीगंध आणि पास-पासचं एक-एक पाकिट फाडून टाकतो. त्यानंतर त्यात एक कप दूध मिसळतो. त्यानंतर तो रजनीगंधी, पासपास आणि दूधाचं चांगलं मिश्रम करतोत. बराचवेळ मिश्रण केल्यानंतर मिश्रण घट्ट आणि त्यापासून आईसक्रिम तयार होतं. त्या आईसक्रिमचे छोटे-छोटे रोल बनवून त्यावर काहीतरी गोड पदार्थ टाकून ते आईसक्रिम ग्राहकांना देतो.
हा अजबगजब व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर younickviralvlogs नावाच्या आईडीवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 8 मिलिअन म्हणजे जवळपास 80 लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर 1 लाख 80 हजार लोकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत लाईक केला आहे. तसंच अनेक लोकांनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
एकीकडे सरकार गुटख्यावर बंदी आणतंय, गुटख्यापासून दूर राहाण्याचा सल्ला देतंय, जाहीरातीवर लाखो रुपये खर्च केले जात असतानात हा व्यक्ती गुटख्यापासून आईसक्रिम बनवत लोकांना गुटख्याची सवय लावत असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. अन्न आणि औषध विभागाने अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही केली जात आहे. काही लोकांनी हे आईसक्रिम खाल्यावर गिळायचं कि थुकायचं असाही प्रश्न विचारला आहे.