Viral Video : `छोटा पॉकेट बडा धमाका`! `या` चिमुकल्याचा डान्स पाहिला का?
Dance Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. निरागस, गोंडस ही पोरं असं काही करतात ही पाहणाऱ्यांची मनं जिंकतात. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल की, `छोटा पॉकेट बडा धमाका`.
Little Boy Viral Video : लहान मुलांचं मन अगदी निर्मळ असतं. लहान मुलं अनेकदा असं काहीतरी करतात, ज्यामुळे त्यांची निरागसता दिसून येते. सोशल मीडियावर आजकाल लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. हे व्हिडीओ पाहून मनं प्रसन्न होतं. दिवसभराचा थकवा हे व्हिडीओ पाहून नाहीसे होतात. क्षणभरात आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. असाच एक मनं जिंकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. (viral video little boy dance performance chhota pocket bada dhamaka trending video on social media)
'छोटा पॉकेट बडा धमाका'!
या व्हिडीओमध्ये एक चिमुकला फुल शर्ट आणि फुल पँट घातला आहे. चेहऱ्यावर कोरोनाचा मास्क लावला आणि हा टक्कल असलेला चिमुरडा चिखलामध्ये अनवाणी पायांनी ड्रमच्या तालावर नाचताना दिसतं आहे. बिनधास्त मनमोकळं कसली पर्वा न करता तो जे काही भन्नाट डान्स करतो आहे. तो पाहून त्या मुलाने नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.
पृथ्वीवर स्वर्गासारखं जगा!
हा व्हिडीओ ट्वीटरवर @AwanishSharan या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी खूपच सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे की,''जसे कोणी पाहत नाही असा डान्स, तुम्हाला कधीही दुखावले गेले नाही असे प्रेम; कोणी ऐकत नाही असे गा आणि पृथ्वीवर स्वर्गासारखं जगा.''
फक्त 24 सेकंदच्या या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या चिमुकल्याच्या डान्सचा व्हिडीओ वारंवार बघितला जातो आहे.