Viral Video: आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात खच्चून टॅलेंट भरलं आहे. आता सोशल मीडियाच्या जमान्यात ते तात्काळच जगासमोर येतंय. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. यामध्ये एका तरुणाने आपल्या बाइकला फोर व्हिलरमध्ये बदलले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. आपण भारतीय ही म्हण अगदी तंतोतंत पाळतो. परदेशी लोकांच्या कल्पनाही करण्यापलीकडच्या गोष्टी आपल्या गावागावात होत असतात.वाहनांच्या बाबतीत जुगाडचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. असाच काहीसा जुगाड यूपीच्या बाराबंकी जिल्ह्यात पाहायला मिळाला. वाहतूक नियमाप्रमाणे बाईकवर दोनच व्यक्ती बसू शकतात. पण या जुगाडू मुलाच्या बाईकवर एक-दोन नव्हे तर नऊ जण बसले आहेत.


सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मोटारसायकलवर नऊ जण बसलेले दिसले. हे पाहून लोकं आश्चर्यचकीत होत आहेत. या बाईकमध्ये 'ब्रेक सोडून सर्व काही महाग आहे. हॉर्न सोडून सर्व काही विकले जाते', अशा प्रतिक्रिया लोकं देत आहेत.  या अजब वाहनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.



 


या जुगाडू बाइकवर एकूण आठ ते नऊजण बसू शकतात. ही जुगाडू गाडी लखनौ-अयोध्या महामार्गावर बाराबंकी शहरातून जाताना दिसली. या दुचाकीवर एक व्यक्ती दिसला असून त्याच्यासोबत आणखी आठ जण बसले आहेत. समोर बाईकवर तीन जण होते, तर बाकीचे पाच लोक एका लाकडी गाडीवर आरामात बसले होते. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 


 साधारणत: नऊ माणसेही मोठ्या कष्टाने गाडीत बसू शकतात. ही जुगाड गाडी दुरून सामान्य गाडीसारखी दिसते, पण जवळून पाहिल्यावर जुगाडच्या पुढे एक मोटरसायकल दिसली. गाडीवरही नंबर नाही. दुसरीकडे, या जुगाड कारमध्ये स्वार झालेल्या लोकांना एकतर याच्या धोक्याची कल्पना नाही किंवा त्यांनी जाणूनबुजून आपला जीव धोक्यात घातला आहे. अशा गाड्या उत्सुकता वाढविणाऱ्या असल्या तरी वाहतूक नियमांमध्ये बसत नाहीत.