मुंबई : भारतीय लोकं जुगाड करताना कधीही मागे हटत नाहीत. ते आपल्या दैनंदिन जिवनातील अनेक गोष्टींचा असा काही जुगाड लावतात की, त्यांच्या समोर मोठे मोठे संशोधक देखील फेल आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लोकांमधील ही कला पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. कारण आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांच्या कल्पनेच्या पलिकडे हे लोकं विचार कर असतात.


आज देखील आम्ही तुम्हाला एक असा जुगाड दाखवणार आहोत, जो तुम्हाला थक्कं तर करेलचं. परंतु तुम्हाला हसायलाही भाग पाडेल.


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. कारण या व्यक्तीने पॅन्टच्या बेल्टच्या बदल्यात असा काही जुगाड केला की, त्याने दोरीच्या एका टोकाला बाटलीच्या वरचा भाग बांधला आणि दुसऱ्या टोकाला बाटलीचं झाकण बांधलं आणि त्याचा बेल्ट सारखा वापर केला.


इंस्टाग्रामवर 'hepgul5'नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याला 2 कोटीहून अधिक Views मिळाले आहेत. यावर लोकंनी मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)


यावर एका यूझरने कमेंट केली की 'ही ट्रिक भारता बाहेर जाता कामा नये.' तर दुसऱ्या युझरने कमेंट केली की, भाऊ तुला 100 तोफांची सलामी'.