मुंबई : आपण अनेकदा मजा मस्करीमध्ये किंवा ओघाओघात असे काही करतो की, ज्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि तेव्हा आपले डोळे उघडतात की आपण जास्तच धाडसाचे किंवा चुकीचे पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर सध्या असाच काहीसा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने लोकांना सावध केलं आहे, त्याचबरोबर लोकांसमोर एक उदाहरण देखील ठेवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालदीवमध्ये सुट्टीसाठी दाखल झालेल्या ब्रिटिश पर्यटक मार्टिन लुईसबरोबरही असेच काहीसे घडले. वास्तविक या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, एक माणूस डोक्यावर टोपी घालून चालत आहे, तेव्हा तो एका अस्वच्छ पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे जातो. त्याला वाटते की, हा छोटा नाला असावा जो मी अगदी लगेच पार करु शकतो. परंतु त्याने हा खड्डा किती खोल आहे किंवा त्यात तो बूडू शकतो का? असा विचार देखील केला नाही, त्याने सरळं आपली चप्पल हातात घेतली आणि उडी मारली.


परंतु त्याला ते नाला नसून दलदल आहे याची कल्पना नव्हती. ज्यामुळे तो पूर्ण त्या दलदलमध्ये बुडला.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये लुईस असे म्हणत आहे की, "मी हा नाला कसा पार करणार आहे हे मला माहित नाही. पण माझी पॅन्ट पाहा खूप खराब होत आहे. माझ्या पायांची स्थिती देखील पाहा, मला खूप प्रयत्न करून हा नाला पार करावा लागणार आहे."


तेवढ्यात लुईस पुढे पाय टाकतो आणि पुर्णपणे त्या पाण्यात बुडतो. काही वेळ तो बाहेर देखील येत परंतु काही सेकंदाने तो बाहेर तोंड काढतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी त्यावर एत कमेंट आली की, हा शॉर्टकट घेतल्याचा परिणाम आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एका वृताशी बोलताना मार्टिन म्हणाले की, मी पाण्यात पाय ठेवताच मी खाली बुडू लागलो, तो म्हणाला की, मला वाटते की तो 9 ते 10 फूट खोल आहे.