मुंबई : आपल्यापैकी प्रत्येक जण सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतो. आपल्याला यावर आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात काही व्हिडीओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ हे आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो तुमच्या हृदयाचा ठोका चुकवेल. या व्हिडीओमध्ये या तरुणासोबत जे घडतं ते धक्कादायक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये,  तुम्ही पाहू शकता की, उंच डोंगरावर एक तरुण झोक्यावर बसला आहे. त्याच्याबरोबर आणखी दुसरा मित्र आहे. जो या झोक्यात बसलेल्या तरुणाला मागून धक्का देत आहे. खरेतर ही एक ऍक्टिव्हिटी आहे. ज्यामध्ये लोकं उंच डोंगरावरुन सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकतात. परंतु हे जितकं सुंदर आहे तितकचं धोकादायक देखील आहे. जे तुम्हाला हा व्हिडीओ पूर्ण पाहून लक्षात येईलच.


डोंगरावर उंचावरुन आपल्या मित्राला झोका देत असताना या दुसऱ्या तरुणाचा पाय त्या झोक्याच्या दोरीत अडकतो आणि तितक्यात झोका पुढे गेल्याने तो तरुण झोक्यासोबत हवेत उडाला. त्यानंतर काही सेकंदसाठी हा तरुण हवेतच राहिला.


हा प्रकार पाहून तुम्हाला वाटेल की, हा तरुण आता गेलाच आणि इतक्या उंचावरुन पडून हा तरुण आता काही जिवंत राहणार नाही. परंतु त्याचं नशिब इतक चांगलं असतं की, तो त्या झोक्यासोबत पुन्हा पाठी येतो आणि खाली जमीनीवर पडतो. ज्यामुळे त्या तरुणाचा जीव वाचवला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर socialstarofficial नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडीओला खूपच पसंती दर्शवली आहे. लोकं हा व्हिडीओ क्लिप केवळ एकमेकांशीच शेअर करत नाहीत, तर यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.


एकीकडे या व्हिडीओमधील तरुणाची फजेती पाहून आपल्याला हसू देखील येतं, परंतु हा प्रसंग खरोखर धक्कादायक आणि जीवघेणा ठरला असता. हा झोका थोडासा जरी इकडे तिकडे झाला असता, तर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला असता.