सरकारी सेवाचा लाभ हवा पण लस नको! नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ
बाबो! एक लस घेण्यासाठी शॉर्ट फिल्मपेक्षाही जबरदस्त या व्यक्तीनं केलाय ड्रामा, एकदा हा व्हिडीओ पाहाच
नवी दिल्ली : कोरोनाचा धोका वाढत असल्याने आता लसीकरण मोहीम गावोगावी राबवली जात आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. लस घेतली नाही तर सरकारी योजना मिळणार नाहीत असं फर्मान सरकारनं काढलं आहे. घराघरात जाऊन लसीकरण केलं जात आहे.
अनेकजण लस घेण्यासाठी घाबरत आहेत. तर काही लोक लस लवकर मिळावी म्हणून जुगाड करत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रेशन दुकानात उभ्या असलेल्या लोकांना ज्यांनी लस घेतली नाही त्यांना लस देण्यात येत आहे.
याच दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका माणसानं लहान मुलांच्या वरताण गोंधळ घातला आहे. या व्यक्तीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. सरकारी सेवा घेण्यासाठी पहिलं पुढे पुढे करणाऱ्या या व्यक्तीची लस घेताना भंबेरी उडाली.
लस घेत असताना या व्यक्तीनं अख्ख गाव डोक्यावर घेतलं. त्याने रस्त्यावर लोळायला सुरुवात केली. अखेर दोन माणसांनी त्याला पकडलं आणि त्यानंतर त्याला लस देण्यात आली. हा व्हिडीओ कुठल्या भागातील आहे याची माहिती मिळू शकली नाही. मात्र हा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.