न्यूयॉर्क : न्यूयॉर्क टाइम स्क्वॉयर (New York Time Square)च्या समोर पैसे उडवतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि मरण्याआधी त्याने आपल्या मृत्यूनंतर पैसे उधळण्यास मित्राला सांगितले. मृत्यूनंतर पैशांची काही किंमत नसते हे जगाला कळू दे असे त्याला सांगायचे होते. असा दावा हा व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुक आणि ट्वीटरवरील हजारो युजर्सनी हा व्हिडीओ शेअर केलाय.  GOQii चे सीईओ विशाल गोंडाल यांनी 15 एप्रिलला व्हायरल टेक्स्टसोबत हा व्हिडीओ शेअर केला होता. गायक मीनू मुनीर यांच्यासहित अनेकांनी हा व्हिडीओ केलाय. पण या व्हिडीओमागचं सत्य वेगळं आहे.



या व्हिडिओचा कोरोनाशी काही संबंध नाही असा दावा Alt न्यूजने केला आहे. हा व्हिडिओ 2019 चा आहे. तपासादरम्यान हा व्हिडिओ 'द गॉड जो कुश' च्या यूट्यूब वाहिनीवर अपलोड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओसह केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.



तपासणी दरम्यान असेही समोर आले आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचे नाव मकसूद ट्रॅक्स अगदजनी आहे. व्हिडिओमध्ये ट्रॅक्स त्याचा मित्र अमेरिकन रैपर जो कुशच्या आठवणीत रस्त्यावर पैसे टाकताना दिसतोय.


व्हिडिओमधील व्यक्ती आपल्या मित्राच्या मृत्यूचे कारण देत नाही. व्हिडिओमध्ये तो म्हणतो की जो कुश हा एक मित्र होता जो खूप पैसे कमावत होता आणि त्याला कोणत्याही कारणास्तव ठार मारण्यात आले. जर त्याचे कुटुंब मला पहात असेल तर मला संदेश द्या.


दक्षिण आफ्रिकेतील बातमीनुसार, जो कुश हा अमेरिकेचा रॅपर आहे. मार्च 2020 पासून कुश सोशल मीडियावर सक्रीय नव्हता. दरम्यान कुशला गोळ्या घालून ठार मारल्याची अफवा पसरली. त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. कुशच्या इंस्टाग्राम पेजवर फ्रेड प्रोडक्शन्स त्याचे बुकिंग पाहतात. रॅपरने 13 मार्च 2020 रोजी आपली शेवटची पोस्ट केली होती. ज्यात तो नोटा मोजताना दिसतोय.


व्हायरल व्हिडिओ या वर्षाच्या सुरुवातीस 20 मार्च रोजी पुन्हा TraxNYC डायमंड ज्वेलरीने अपलोड केला होता. TraxNYC ही न्यूयॉर्क आधारित ज्वेलरी कंपनी आहे. जो मकसूद ट्रॅक्स अगदजनी यांनी याची स्थापना केली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये देखील तीच व्यक्ती आहे.